ती त्याच्या कडे गेली होती भविष्य घडवायला पण त्याने तिचे भविष्य बिघडवले

बॅटमिंटन कोच कडून १६ वर्षीय विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण
कोच ने तिचे विवस्त्र फोटो मागविले
आजीच्या मोबाईल वरून तिने फोटो पाठवल्याने हा किळसवाणा प्रकार झाला उघड
बेगळुरू / नवप्रहार डेस्क
तिला खेळत आपले भविष्य घडवायचे होते. स्पोर्ट कोट्यातून नोकरी मिळवून स्वतःचे आणि कुटुंबाचे भले करून घ्यायचे होते. त्यामुळे ती बॅटमिंटन कोच कडे बॅटमिंटन चे धडे घ्यायला गेली होती. पण त्या नराधमाच्या मनात भलतेच काही होते. कोचिंग च्या नावावर त्याने तिचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. मुलीने आजीच्या मोबाईल वरून कोच laa तिचे विवस्त्र फोटो पाठवल्याने आणि हा प्रकार आजीच्या लक्षात आल्याने ही घटना उघड झालीं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीने अपल्या आजीच्या मोबाईलवरून एका अनोळखी क्रमांकावर तिचा नग्न फोटो पाठवला होता. हे आजिच्या लक्षात आल्यानंतर, त्यांनी यासंदर्भात लगेचच तिच्या आई-वडिलांना याची माहिती दिली. यानंतर, पीडितेच्या आईने यासंदर्भात तिच्याकडे विचारणा केली असता, कोचने अतिरिक्त प्रशिक्षण देण्याच्या बहाण्याने अनेकवेळा आपले लैंगिक शोषण केले, तसेच यासंदर्भात कुणालाही काहीही न सांगण्याची धमकी दिल्याचे तिने आईला सांगितले.
यानंतर, पीडितेच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यात पीडितेच्या आईने म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपूर्वी, त्यांच्या मुलीने एका स्पोर्ट्स सेंटरमध्ये बॅडमिंटन कोचिंगसाठी प्रवेश घेतला होता. येथे कोचने तिच्यावर अनेकवेळा लैंगिक अत्याचार केले. त्याने तिला घरीही नेले होते आणि तेथेही तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
तामिळनाडूतीन रहिवासी आहे कोच –
पीडितेच्या आईने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “10वीची परीक्षा दिल्यानंतर आपली मुलगी आजीच्या घरी गेली होती. तिने 30 मार्चला तिच्या बॅडमिंटन कोचच्या म्हणण्यावरून काही नग्न फोटो पाठवले होते.” यासंदर्भात एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित कोच विरुद्ध पोक्सो अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला गुरुवारी अटक करण्यात आलीआहे.
इतरही काही मुलींचे फोटो सापडले –
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने गुन्हा कबूल केला आहे. चौकशीत त्याच्या मोबाईलमध्ये संबंधित मुलीच्या नग्न फोटोसह इतरही मुलींचे नग्न फोटो सापडले आहेत