क्राइम

त्याच्या संशयी स्वभावामुळे ती वेगळी रहायला लागली ; आणि त्याच रागात त्याने तिला संपवले 

Spread the love

बेंगळुरू /. नवप्रहार ब्युरो

                  म्हणतात न की जगात सगळ्याच गोष्टीवर औषध आहे. पण शंकेवर कुठलेच औषध नाही. कारण शंकेचा किडा एकदा का मनात घर करून गेला की मग तो डोक्याला सतत पोखरत असतो. आणि शंका कमी  होन्याऐवजी ती वाढतच जाते. असाच प्रकार या प्रकरणात पाहायला मिळाला आहे. तो तिच्यावर शंका करायचा. त्याच्या शंकेच्या सवयीमुळे ती मुलीला घेऊन वेगळी राहत होती. त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार करून तिची हत्या केली.

बायकोचं अफेयर असल्याच्या संशयातून त्याने हा चाकू हल्ला केल्याचं सांगितलं जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार वर्षापासून दोन्ही नवरा बायको वेगळे राहत होते. पण या घटनेमुळे बंगळुरूमध्ये खळबळ उडाली आहे.

कृष्णाप्पा असं या 43 वर्षाय व्यक्तीचं नाव आहे. त्याची पत्नी शारदा ही 40 वर्षाची आहे. शारदा ही गृहिणी होती, पण नवऱ्यापासून वेगळी राहत असल्यापासून ती कामाला जायची. कृष्णप्पा ऊर्फ कृष्णा हा बागेपल्ली येथील राहणारा आहे. त्याने भररस्त्यावर पत्नीची चाकू भोसकून हत्या केली. हा प्रकार पाहून रस्त्यावरील लोकांनी त्याला तात्काळ पकडलं आणि पोलिसांच्या हवाली केलं.

अन् रस्त्यावरचं तडपणं थांबलं…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 8 वाजता ही घटना घडली. शारदा कामावरून घराकडे जात होती. कृष्णप्पा रस्त्याच्या कडेला आधीपासूनच दबा धरून बसला होता. त्याने बाजारातून दोन नवीन चाकू आणले होते. तो फक्त शारदाची येण्याची वाट पाहत होते. शारदा रस्त्यावरून येत असतानाच धावतपळतच तो तिच्याजवळ आला. तिच्याशी काही बोलण्याच्या आधी आणि ती सावध होण्याच्या आतच त्याने तिच्यावर चाकूने सपासप वार करण्यास सुरू केली. त्याने थेट तिच्या मानेवरच असंख्य वार केले. त्यामुळे रक्ताच्या चिरकांड्या उडाल्या. शारदाची किंकाळी फुटली. रक्त वाहत होतं आणि अचानक ती खाली पडली. रस्त्यावर तडफत असलेल्या शारदाचा देह काही क्षणातच शांत झाला.

पळून जाण्याचा प्रयत्न केला…

या हल्ल्यानंतर कृष्णप्पाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी त्याला पकडलं. एकाने पोलिसांना फोन केला आणि पोलिसांनी घटनास्थळी येऊन कृष्णप्पाला अटक केली. कृष्णप्पा आणि शारदाच्या लग्नाला 17 वर्ष झाली होती. त्यांना दोन मुले आहेत. एक 15 वर्षाचा आहे. तर मुलगी 12 वर्षाची आहे. पण दोघांमध्ये नंतर जमेना झालं. कृष्णप्पा रोज तिच्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे त्यांच्यात वाद होत होते. रोज घरात भांडणं होऊ लागली. त्यामुळे शारदाने वैतागून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या चार वर्षापासून ती वेगळी राहत होती. कृष्णासोबत मुलगा राहत होता. तर शारदा मुलीसोबत राहत होती.

कामावरून सुटण्याची वेळ माहीत होती…

दरम्यान, या प्रकरणावर पोलिसांनी माहिती दिली. कृष्णप्पा बागेपल्ली येथून दोन चाकू घेऊन आला होता. त्याने हल्ल्याची पूर्ण योजना बनवली होती. शारदा कामावर कधी जाते आणि कामावरून कधी सुटते याची त्याला माहिती होती. त्याने रात्री 8 वाजेपर्यंत वाट पाहिली. शारदा येताच तिच्यावर हल्ला केला. शारदाचा जागेवरच मृत्यू झाला, असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं. कृष्णप्पा एक रोजंदारी कामगार आहे. त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close