आर्वी शहरांमध्ये अतिक्रमणावर दबंग कारवाई व्यापाऱ्यांनी मागितला ४८ तासाचा वेळबेकायदेशीर कारवाई कराल तर बेमुदत मार्केट बंद ठेवू असा दिला व्यापाऱ्यांनी इशारा

पाच वर्षापासून रखडलेल्या आर्वी – तळेगाव रोड व अनाधिकृत अतिक्रमणामुळे एका तरुणीला गमावा लागला आपला जीव
आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : १ डिसेंबर रोजी शासकीय तंत्रनिकेतन मध्ये शिकणारी प्रियांशी रमण लायचा हीचा ट्रकच्या अपघातात मृत्यू झाला या घटनेने आर्वी शहर चांगलेच तापले होते. त्या अपघाताचे मुख्य कारण म्हणजे ५ वर्षापासून रखडत असलेला आर्वी-तळेगाव रोड व अनाधिकृत रित्या केलेले अतिक्रमण आहे असे सांगण्यात आले. तसेच नागरिकांचा आक्रोश पाहता आर्वी पोलीस स्टेशन येथे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी सुलेमान व मुख्य व्यापाऱ्यांना बोलावून सर्व शासकीय कर्मचाऱ्यांच्या समक्ष मीटिंग घेण्यात आली तसेच काही लोकांनी अनाधिकृत पद्धतीने केलेले अतिक्रमण हटवावे
या अतिक्रमणामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना त्रास होत असल्यामुळे अपघाताला आमंत्रण देत आहोत असे व्यापाऱ्यांनी सांगून अनाधिकृत रित्या अतिक्रमण शासन दरबारी कायदेशीर हटवण्याची मागणी केली.
यामुळे प्रशासनाच्या वतीने नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता लाऊडस्पीकरच्या माध्यमातून दंवडी देण्यात आली २ नोव्हेंबर सकाळी १० वाजता पासून शासकीय अधिकारी यात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार , मुख्याधिकारी, ठाणेदार व दंगल पथक अंदाजे ४० ते ५० पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा होता व तीन जेसीबी घेऊन अतिक्रमण हटवण्याकरिता मोहीम राबवण्यात आली.
आर्वीच्या मुख्य रोडवर शिवाजी चौक ते गांधी चौक व शिवाजी चौक ते वर्धा रोड तसेच शिवाजी चौक ते पुलगाव रोडव शिवाजी चौक ते देऊरवाडा रोड अशा मुख्य रोडवरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला टिनाचे व शटरचे पक्के ठेले आहे ते पायदळ चालण्याच्या भर रस्त्यावर आल्याने पायदळ चालण्याकरिता रस्ता सुद्धा उरलेला नाही पायदळ चालत असताना समोरुन येणारे वाहन अंगावर येणार की काय अशी मनात नेहमी भीती राहते रोडच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढल्याने अतिक्रमण हटवण्याकरिता आर्वीकर नागरिकांची सतत मागणी आहे.
बऱ्याच वर्षापासून प्रशासन यावर दुर्लक्ष करत असल्याने बेरोजगाराचा मुद्दा असल्याने राजकीय नेते पण त्यांना सपोर्ट करतात परंतु आज पर्यंत कोणत्याही नेत्यांनी रोजगाराचा मार्ग काढला नसून फक्त इलेक्शन जवळ आले की मोठ्या मोठ्या गोष्टी करतात आर्वी तालुक्यात कोणतेही रोजगाराचे साधन नसल्यामुळे या अतिक्रमणाला फक्त आणि फक्त राजकीय नेतेच दोषी आहे. अशी आर्वी शहरात चर्चा सुरू आहे. बेरोजगारी वाढली असून गेल्या किती वर्षापासून आर्वीकर नागरिकांना फक्त आश्वासना व्यतिरिक्त काहीच भेटलेले नाही कोणताही रोजगार उपलब्ध झालेला नाही. गेल्या कित्येक वर्षापासून एमआयडीसीचे निवेदन दिले असून सुद्धा यावर कोणत्याच नेत्याचे लक्ष नाही मात्र राजकीय नेते गब्बरसिंग झालेले आहे. त्यांना कोणाचीही परवा नाही कोणी जगो की मरो आपल्या राजकीय रोट्या शेकणे हाचा त्यांच्या गोरख धंदा आहे. अनाधिकृत रीत्या अतिक्रमणाविषयी कायदेशीर कारवाई व्हावी
अनधिकृत पद्धतीने केलेल्या अतिक्रमणाविषयी राजकीय नेत्यांनी हस्तक्षेप करू नये अशी नागरिकांमध्ये चौका चौकात चर्चा हाेत आहे.
व राजकीय नेत्यांनी ताबडतोब बेरोजगारावर तोडगा काढावा अशीही मागणी आर्वीकर करीत आहे.
*गरीबांचे हटवले तर श्रीमंतांना बचावले असा दुझाभाव व श्रीमंतांना सवलती का? असा गरिब व्यवसायिकांचा टोला*
*अधिकारी व व्यापार्यामध्ये चर्चा कायदेशीर अतिक्रमण हटवण्यास ४८ तासाचा मागितला वेळ*
आम्हाला अतिक्रमण हटवण्याबद्दल विरोध नाही परंतु बेकायदेशीर रित्या आमच्या दुकानावर बुलडोजर चालाेल्याने आमचे आर्थिक नुकसान झाले आहे याची आम्हाला शासनाने भरपाई करून द्यावे सर्व व्यापारी आक्रोश होऊन मत व्यक्त करून सुमित दादा वानखडे यांच्याकडे जाऊन दाद मागितली व त्यांनी लगेच मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना फोन लावून जे काही बेकायदेशीररित्या अतिक्रमण हटवणे सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी व अतिक्रमण ताबडतोब थांबवावे व कलेक्टर साहेबाला कायदेशीर ४८ तासाचा वेळ देऊन अनाधिकृ्त रीत्या अतिक्रमण आहे फक्त तेच हटवायला सांगावे अशी सुमित वानखडे यांनी मागणी केली व त्यांच्या शब्दाला मान देऊन बेकायदेशीर होत असलेले अतिक्रमण थांबवण्यात आले. तोपर्यंत बेमुदत मार्केट बंद राहील असा व्यापारी वर्गांनी इशारा दिला आहे.
तसेच श्रीमंताचे अनधिकृत रित्या अतिक्रमणावर ४८ तासानंतर त्यांच्या अतिक्रमणावर गजराज चालणार का? असे आर्वीकर जनतेचे लक्ष लागलेले आहे.