श्री संत गाडगेबाबा व छत्रपती शिवाजी महाराज यांची गाडगेबाबा चौक लाखांदूर येथे संयुक्त जयंती साजरी…
लाखांदूर / प्रतिनिधी
स्वच्छतेचे जनक श्री संत गाडगेबाबा व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती श्री. संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समिती लाखांदूर तर्फे साजरी करण्यात आली. काल लाखांदूर नगरीत ग्रामस्वच्छता करण्यात आली व आज दि.२३/०२/२०२४ ला जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सदर जयंती कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री रामचंद्रजी राऊत सर, प्रमुख अतिथी श्री गोविंदरावजी भुरले गुरुजी, श्री बबलूजी नागमोती, श्री राजकुमारजी टेकाम सर, हरिश्चंद्रजी सोंदरकर, श्री नरहरीजी मेश्राम, श्री आकाश केळझरकर, श्री नरेंद्रजी घोरमोडे, सौ. नलुताई ठाकरे, सौ.शिलाताई दोनाडकर, सौ. सरस्वती ताई मेश्राम, सौ. हर्षाताई प्रधान, श्रीमती ताराबाई प्रधान, सौ.सारजाताई बेंदवार, दुर्गाताई वारके, श्री संत गाडगेबाबा जनकल्याण उत्सव समितीचे माझी सचिव श्री. फागोजी कडीखाये, सदस्य दिलीप गजबे, आदित्य राजगडे यांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन करून जयंती कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
जयंती निमित्त साडीचोळी दान, जेष्ठ नागरिकांचा सत्कार, विशेष सत्कार बाबांची प्रतीमा भेट देण्यात आले. तसेच उपस्थित अतीथींनी बाबांच्या जीवनावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन समितीचे अध्यक्ष श्री नितीन पारधी यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्री नरेंद्रजी घोरमोडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सदस्य श्री चंद्रकांतजी दिवठे, गणेश ठाकरे, हरिदास राऊत, भोजराज एफजी कडिखाये, रामकृष्ण दिवठे, प्रकाश राऊत, वसंता गुरूनुले, संजय वाटगुळे, हेमराज प्रधान, गणेश कार, रमेश खरकाटे, कुणाल प्रधान, मोहित गुरनूले, सुरज तलमले, मानव कडीखाये, सौ. पुजाताई भागडकर, सौ. अरुणाताई कडीखाये, कु.उन्नती कडीखाये, सोहम देसाई यांनी प्रयत्न केले.