ती चार दा स्वर्ग बघून आल्याचा करतेय दावा
व्यक्तीच्या मरणांनातर त्याच्यासोबत नेमके काय घडते हा सर्वांसाठी कुतूहलाचा विषय आहे. मृत्यू नंतर स्वर्ग आणि नरक याला घेऊन अनेक किवंदती आहेत. काही वेळा मोजक्या लोकांनी मेल्या नतंर जिवंत होण्याचा आणि दरम्यान स्वर्ग पाहून आल्याचा दावा केला आहे. एका 62 वर्षीय महिलेने चार वेळा मृत्यूला हारावल्याचा आणि स्वर्ग पाहण्याचा दावा केला आहे.
मृत्यूनंतर माणूस शरीर सोडल्यावर कुठे जातो? आत्मा कोणासोबत जातो आणि स्वर्ग किंवा नरक कसे दिसते? असे अनेक प्रश्न प्रत्येकाच्या मनात असतात. काही लोक त्यांचे मृत्यूनंतरचे अनुभव सांगून यांची उत्तरे देतात. हे किती खरे किंवा खोटे आहे हे माहित नाही, पण ते निश्चितच रोमांचक असते.
4 वेळा आत्मा शरीरातून बाहेर पडला
62 वर्षांची शॅरन मिलिमन दावा करते की, तिने तिच्या आयुष्यात चार वेळा मृत्यूला हरवले आहे. हा क्रम तेव्हा सुरू झाला जेव्हा ती 13 वर्षांची होती. ती सांगते की ती तिच्या आईसोबत पोहायला गेली होती, पण अचानक ती कसे पोहायचे विसरली आणि ती बुडायला लागली. याच दरम्यान तिला असे जाणवले की, तिचा आत्मा वरती तरंगत आहे आणि तिचे शरीर खाली बुडाले आहे. ती घाबरलेली नव्हती किंवा तिला वेदनाही होत नव्हती, याच वेळी lifeguards ने तिला वाचवले आणि ती CPR नंतर पुन्हा जिवंत झाली. त्याचप्रमाणे, वयाच्या 43 व्या वर्षी तिच्यावर वीज पडली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले, तिथेही तिचे शरीर पृथ्वीवर होते आणि आत्मा तरंगत स्वर्गात पोहोचला होता. जेव्हा ती पुन्हा जिवंत झाली, तेव्हा तिला काहीच समजत नव्हते. तिसऱ्यांदा तिचा आत्मा एका शस्त्रक्रियेदरम्यान शरीरातून बाहेर पडला आणि चौथ्यांदा ती चुकीच्या औषधांमुळे मरण पावली.
एक प्रकाश आला आणि त्याने मला मिठीत घेतले
शॅरन सांगते की, तिला या दरम्यान वेगवेगळे अनुभव आले. ती म्हणते की एकदा तिच्याकडे एक प्रकाश आला आणि तो जवळ येताच खूप मोठा झाला आणि त्याने तिला मिठीत घेतले आणि स्वर्गात घेऊन गेला. तिथे गुलाबी आणि सोनेरी ढग होते आणि एक सोनेरी पुस्तक ठेवले होते, ज्यामध्ये काहीतरी वेगळ्या लिपीत लिहिले होते. तिने अनेकवेळा येशू ख्रिस्तलाही पाहिले आणि तिथे अनेक मार्गदर्शकही होते. तिला चांगले जेवण दिले गेले आणि ती म्हणते की ती आभारी आहे की तिला हे सर्व इतके जवळून बघायला मिळाले. यानंतर तिचे जीवन खूप बदलले आणि तिची विचारसरणीही बदलली.