क्राइम

एआय चा दुरुपयोग करत तीन तरुणांनी प्रसिद्ध केली महिलांची नग्न छायाचित्रे

Spread the love

समाज माध्यमांवर केली व्हायरल ; पोलिसांनी केली अटक

सारगोड (केरळ)  / नवप्रहार डेस्क 

                 विज्ञान शाप की वरदान हा सुरवाती पासून वादविवादाचा विषय राहिला आहे. पण विज्ञानाने केलेल्या प्रगतीची कास धरत जग चंद्रावर पोहचले आहे. एखाद्या गोष्टीचे जसे फायदे असतात तसे तोटेही असतात. एआय ( आर्टिफिशियल इंटेलिजन्स ) हा त्यातीलच प्रकार . पण याचा दुरुपयोग करत तीन तरुणांनी 150 महिलांची नग्न छायाचित्रे बनवत ती समाज माध्यमांवर प्रसिद्ध केली आहे. यापैकी ऐका तरुणाच्या मित्राच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्याने याबद्दल पोलिसांना कळवल्यावर हा प्रकार समोर आला आहे. केरळमधील कासारगोड जिल्ह्यातील एका गावातील हे प्रकरण आहे.

या प्रकरणी पोलिसांनी जस्टिन जेकब, अबिन जोसेफ आणि शिबिन लुकोस यांना अटक केली आहे. गेल्या दीड वर्षापासून त्यांचा हा प्रकार चालू होता.

ज्या महिलांची छायाचित्रे सामाजिक माध्यमांवर उपलब्ध नव्हती, त्यांची छायाचित्रे हे तिघे त्यांच्या कॅमेर्‍याद्वारे काढत होते. या तिघांनी त्यांच्यासमवेत शिकणार्‍या किमान ४० विद्यार्थिनींच्या छायाचित्रांमध्ये पालट करून नग्न चित्रे सिद्ध केली होती. चर्चमध्ये रविवारच्या प्रार्थनेसाठी जाणार्‍या महिलांनाही त्यांनी लक्ष्य केले होते. या कृत्यामुळे गावातील महिलांमध्ये घबराट पसरली आहे.

तीन आरोपींपैकी एक असलेल्या शिबिन लुकोस याच्या मित्रामुळे हा प्रकार उघडकीस आला. शिबिनच्या मित्राला सिबिनच्या भ्रमणभाषमध्ये त्याच्या एका नातेवाईकाचे अश्‍लील छायाचित्र दिसले. त्यानंतर त्याला अशी शेकडो नग्न छायाचित्रे सापडली. त्याने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत तिघांनाही कह्यात घेतले. पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ‘आयटी’ कायद्याच्या कलम ६७ नुसार गुन्हा नोंदवून त्यांना अटक केली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close