हटके

अजित दादा यांच्या विमान दुर्घटने बाबत आणखी एक अपडेट

Spread the love

बारामती / विशेष प्रतिनिधी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात होऊन चार पाच दिवस लोटले आले तरी हा अपघात की घातपात या विषयाला घेऊन शंका उत्पन्न केल्या जात आहे. विमानाचा अपघात होत असताना कोणीतरी त्यातून उडी मारण्याचा प्रयत्न करीत होता असें तिथल्या सरपंचाने सांगितल्याचे आ.अमोल मिटकरी यांनी एका कार्यक्रमादरम्यान सांगितले. आम्ही तिकडे धाव घेतली असता विमानात ब्लास्ट झाला असेही संबंधिताने सांगितल्याचे मिटकरी यांचे म्हणणे आहे.

27 जानेवारीची पूर्ण माहिती घेतली आहे. मंत्रालयाचा कामकाजासाठी मुंबई देवगिरीला गेले होते. पक्षांच्या लोकांना भेटून दादा रात्री आठ वाजता फ्री झाले. देवगिरी बाहेर गाड्या तयार होत्या.वाहनांनी निघाले असते, तर रात्री दहा वाजेपर्यंत बारामतीत पोहोचले असते. जर रात्रीच दादा निघाले असते तर २ तासात बारामती पोहोचले असते. आज हा विमानाचा अपघात टळला असता. मात्र घात आहे की अपघात? आहे ही मोठी शंका आहे. आजचा सहावा दिवस आहे, दादांच्या मृत्यूचे गूढ अजूनही महाराष्ट्रासमोर कायम आहे.आमदार अमोल मिटकरी यांनी अपघातप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केली आहेत, त्यामुळे अनेकांच्या मनातही संशयाची पाल चुकचूक लागतेय.

विमानातून सहा लोकं प्रवास करत असल्याची माहिती डीजीसीएचने दिलीय पण पोलिसांना प्रत्यक्षात ५ जणांचे मृतदेह सापडली आहेत. पायलटबाबतही मिटकरी यांनी प्रश्न उपस्थित केलेत, आधी सिंग नावाचा पायलट विमानाचे उड्डाण करणार होता. पण ऐनवेळी कपूर नावाचा पायलट येतो. स्फोट होऊन विमान जळून खाक होतात, पण कागदपत्रे कशी जळत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय.

अपघातप्रकरणी शंका उपस्थित होते, कारण ज्या कंपनीचे विमान आलं होतं, त्या कंपनीवर 1 वर्षांपासून बंदी होती. काल दादांची ओळख घड्याळमुळे पटल्याची मीडियासमोर शंका व्यक्त केली होती. आज दादांची ओळख पिवळ्या कुर्त्यामुळ पटल्याची सांगण्यात येत आहे. मला शंका आहे, या अपघात प्रकरणाची सीबीआय आणि उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, चौकशी समिती माजी न्यायमूर्तीच्या नेतृत्वात झाली पाहिजे. सीटबेल्ट लावल्याशिवाय दादा गाडीत बसत नव्हते, त्यांचा अशाप्रकारे अपघात होणं, मनाला पटत नसल्याचं मिटकरी म्हणालेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close