शाशकीय

जुन्या पेन्शनसाठी कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप

Spread the love

 

दुसऱ्या दिवशीही संप सुरुच, कार्यालये ओस

चिमूर ता, प्र, ज्ञानेश्वर जुमनाके

जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसाठी आजपासून सरकारी निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी बेमुदत संपावर गेले आहेत. सरकारी निमसरकारी कर्मचारी शिक्षक संघटना समन्वय समितीच्या आवाहनानुसार राज्यातील लाखो कर्मचारी संपावर गेले आहेत.

चिमूर तालुक्यातही राज्य सरकारी कर्मचारी तसेच शिक्षक संपावर गेले असून बहुतेक शाळा बंद आहेत.सरकारी कार्यालये ओस पडली आहेत. कार्यालयात शुकशुकाट आहे.या संपासंदर्भात शासनाकडे ज्या मागण्या केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करण्यात यावी, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करण्यात यावे, सरकारी कामकाजातील खाजगीकरण व कंत्राटीकरण बंद करावे, वस्तीशाला शिक्षकांना मूळ नियुक्ती दिनांकापासून वेतनश्रेणी लागू करण्यात यावी, सावित्री फातिमा कॅशलेस आरोग्य योजना लागू करण्यात यावी, पाच दिवसांचा आठवडा करण्यात यावा, शिक्षकांना अशैक्षनिक कामे देण्यात येऊ नये आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.या मागण्यासाठी राज्य कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप आहे.

संपाच्या दुसऱ्या दिवशी तहसील कार्यालयासमोर कर्मचारी एकत्र येऊन शासनाविरुद्ध एल्गार पुकारला आहे. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी संपात उपस्थित कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close