हटके

अन् त्यांनी धावत्या ट्रेन मध्येच उरकवले लग्न 

Spread the love
अनेक प्रवाशांनी मोबाईल कॅमेरात कैद केला तो क्षण

आनंद आणि नाविण्यासाठी पैशाची आवश्यकता नसते तो कुठेही घेता येतो. फक्त तुम्हाला तो घेता आला पाहिजे. अगदी थोडक्या पैशात म्हणजेच नाश्त्याच्या पैशात लग्नाचा आनंद कसा घेता येऊ शकतो हे ऐका जोडप्याने धावत्या ट्रेन मध्ये लग्न करून दाखवून दिले आहे. या लग्नाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून काही वेळातच त्याला 1.50 लाख लोकांनी पाहिले आहे.

व्हायरल व्हिडिओमध्ये एक जोडपे चक्क धावत्या ट्रेनमध्ये लग्न करताना दिसत आहे. यावेळी त्यांना पाहण्यासाठी ट्रेनमध्ये मोठी गर्दी जमते. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, धावत्या ट्रेनमध्ये मुलगा मुलीच्या भांगेत सिंदूर भरतो. यानंतर मुलगी ट्रेनमध्ये लोकांसमोर त्याला मिठी मारते. नंतर तो तिच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो आणि मग दोघेही एकमेकांच्या गळ्यात हार घालतात. यानंतर ती मुलगी पुन्हा एकदा त्याला मिठी मारते आणि त्याच्या पायाला स्पर्श करते. यावेळी ट्रेनमधील इतर प्रवासी आपल्या मोबाईलमध्ये ही संपूर्ण घटना कॅप्चर करतात.

ही घटना आसनसोल ते जसिडीह मार्गादरम्यान घडली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर max_sudama_1999 नावाच्या अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 1 लाख 48 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 3 हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईकही केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close