अंजनगांवसुर्जीच्या धनाढ्य कापुस कारखानदारांची दहाकोटी रुपयाची सेसचोरी उघड
गेल्या पाचवर्षीच्या कापुस खरेदीत कमी खरेदी दाखवत बाजारसमीतीच्या तोंडाला पुसली पाने-
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
–अंजनगांवसुर्जीच्या कृषी ऊत्पन्न बाजारसमीतीमध्ये कापुस प्रक्रीया ऊद्योजक,कारखानदाराकडुन २०१६ ते २०२२या आर्थिक वर्षात करोडो रुपयाचा सेस चोरी झाली असल्याचे उघडकीस आली आहे. फसवणूक करणारी आकडेवारी ,खोटी कापुस खरेदी दाखवत तब्बल दहा कोटी रुपयाचा सेस चोरी करणाऱ्या पांढऱ्या कापसाच्या धंद्यात वावरणाऱ्या तथाकथित उद्योजकांचे काळेधंदे उघडकीस आले आहे. कृषी उत्पन्न बाजारसमीत्यांना १९६३ च्या कृषि उत्पन्न खरेदी विक्री नियमन अधीनीयमा प्रमाने व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या शेतमालावर शेकडा एक रुपया बाजार फी व पाच पैसे सुपरव्हीजन फी (सेस) या स्वरुपात आकारन्याचे अधीकार प्रदान आहेत.कापसाच्या खरेदीवरील सेस च्या माध्यमातून अंजनगांवसुर्जी बाजारसमीतीला दरवर्षी दोन ते अडीच कोटी रुपयाचे सेस प्राप्त होणे अपेक्षीत असताना तालुक्याच्या बाजारसमीतीत स्थानिक कापुस उद्योजकांनी दरवर्षी लाखात सेस भरणा केला होता. हि बाब खटकणारी असताना व यात अपहार झाला आहे,यात बाजारसमीतीच्या कर्मचाऱ्याचा हस्तक्षेप आहे,प्रत्यक्षात झालेली खरेदी व दर्शवीलेली खरेदी बोगस आहे याचे सुगावा लागल्यावर प्रकरणात शोधघेत पाठपुरावा केला असता,सन २०१६ते२०२२ या पाच वर्षाच्या कालखंडात बाजार क्षेत्रातील कापुस जिनींग प्रेसींग प्रक्रीया उद्योजक व व्यापाऱ्यांनी वस्तु आणी सेवा कर विभागा (GST) कडे कच्च्या कापसावर ३६कोटी ४८लक्ष ६३हजार१९६ रुपये आर.सी.एम. च्या स्वरुपात कर भरणा केल्याचे आढळले.कापुस व्यापाऱ्यांनी या कालखंडात ७,०९,७२,६३,९२० रुपये कीमतीच्या कच्च्या कापसाची खरेदी केलेली होती.या खरेदीवर कापूस व्यापा़ऱ्यांनी बाजारसमीतीस सात कोटी पंचेचाळीस लक्ष एकविस हजार दोनशे एकाहत्तर रुपये सेस बाजारसमीतीस देने अपेक्षीत होते.परंतु या व्यापाऱ्यांनी पाच वर्षात समीतीला खोटी आकडेवारी सादर करुण फक्त चौप्पन्न लक्ष दहाहजार पाचशे एकवीस रुपयाचा (५४,१०१२९) भरणा करुण सहा कोटी बॕन्नव लक्ष दहाहजार सातशे पन्नास(६,९२,१०,७५० )रुपयाची सेस चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे.विषेश म्हणजे बाजारसमीती मध्ये दरवर्षी लेखापरीक्षा विभागामार्फत दरवर्षी लेखापरीक्षन होत असताना प्रत्येकवेळी आॕडीटर कडुन कापुस सेस मध्ये गळती आहे , सेस कमी वसुलल्या गेला,समीतीस्तरावर अयोग्य नियोजन,वसुलीत सातत्याचा व धोरणाचा अभाव असे ठपके व मत नोंदविल्यावरही या अहवालावर व करोडो रुपयाचे सेस चोरीवर तत्कालीन समीती प्रशासनाकडुन व नियंत्रण प्राधिकरण जिल्हा उपनिबंधक कार्यालया कडुन दखल घेतल्या गेली नसल्याने सदर करोडो रुपयाची सेस चोरी झाली आहे.हे लेखापरीक्षा व जिल्हाउपनिबंधक विभागाचे अपयश की हेतुपुरस्परपणे केलेली डोळेझाक यावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. सदर सेस चोरी ची आकडेवारी २०१६ते२०२२ या कालखंडातील असुन २०२३व २४ मधील कापुस उद्योजक व्यापाऱ्यांनी बाजारसमीतीत भरलेला अत्यल्प सेस पाहता हीसेस चोरी१०००लाखा पर्यत जाण्याची शक्यता आहे .
— .कापसाची आवक पाहता उपरोक्त कालखंडात बाजारसमितीमध्ये भरलेला सेस नगण्य आहे. याकरिता बाजारसमितीचे तत्कालीन सचिव हे संपूर्णपणे जबाबदार आहेत. विक्रीकर विभागाची आकडेवारी पाहता सेस चोरी झाल्याचे म्हणण्यास बळकटी येते. सेस चोरी झाली असल्यास ती व्याज व दंडासहित वसुल करण्यात येईल व बाजार नियम अधिनियमाप्रमाणे कारवाई करण्यात येईल. यापूर्वी मागील कालखंडात झालेल्या सेस चोरीची संशयित आकडेवारी पाहता आमच्या नवीन संचालक मंडळाकडून कापसाच्या प्रत्येक बोंडाचा हिशेब घेऊन वसूल करण्यात येईल, याची दक्षता घेण्यात येत आहे.
अॅड. जयंत जी. साबळे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती अंजनगाव सुर्जी,