शैक्षणिक

बनावट तुकडी दाखवून लाटले शासकीय अनुदान 

Spread the love

शिक्षणाधिकारी ,मुख्याध्यापक आणि संस्था व्यवस्थापकावर गुन्हा दाखल 

पुणे /  नवप्रहार मीडिया

                  शासन आणि प्रशासनाला मूर्ख समजून स्वतःचा फायदा करून घेण्याचा प्रयत्न काही संस्था चालक करीत असतात. पण कधी कधी त्यांचा दावा उलटा पडतो. असाच प्रकार भोसरी येथील बारसे महाविद्यालयात घडला आहे. तक्रारी नंतर समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात तत्कालीन शिक्षणाधिकारी ,मुख्याध्यापक आणि संस्था व्यवस्थापकांचा समावेश आहे.”

ना. बारसे माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वंदना लढे आणि संस्था व्यवस्थापक यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत उपशिक्षणाधिकारी अनंत दाणी (वय ५२) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे बारसे विद्यालयातील तुकडी अनुदानाबाबत तक्रार करण्यात आली होती.

मुख्याध्यापकांनी बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची दिशाभूल केली. तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) आणि कर्मचाऱ्यांनी कागदपत्रांची पडताळणी न करता मान्यतेचे आदेश दिल्याचे तक्रारीत म्हटले होते. बारसे विद्यालयात कोणत्याही तुकड्या वाटप झालेल्या नव्हत्या. उपशिक्षणाधिकारी पांडुरंग थोरे यांच्या स्वाक्षरीने मान्यता देण्यात आली, असे चौकशीत आढळून आले. प्रभारी मुख्याध्यापकांनी तीन कर्मचाऱ्यांना विनाअनुदानित तत्वावर मान्यता देण्याचा प्रस्ताव शिक्षणाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. त्यानंतर चौकशी समितीने तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close