अपघात

समृद्धी महामार्ग ठरत आहे मृत्यूचा मार्ग ; कार चा अपघात ,1 ठार  तीन जखमी .

Spread the love

वाशीम / नवप्रहार मीडिया 

                   उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने तयार करन्यात आलेला समृद्धी महामार्ग हा मृत्यूचा मार्ग ठरत आहे. तज्ञांकडून अनेक उपाययोजना मागविण्यात येऊन त्यावर अंमलबजावणी करून देखील या महामार्गावर अपघाताची मालिका काही केल्या थांबत नसल्याचे समोर येत आहे. पुण्याहून अमरावतीकडे निघालेल्या कार चा वाशीम जिल्ह्यातील वनोजा – कारंजा दरम्यान चॅनल क्र. 196 जवळ हा अपघात घडला आहे. यात एकाचा मृत्यू तर तीन जखमी झाले आहेत.

मंगळवारी संध्याकाळी गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला जाणाऱ्या कारचा वन्यप्राण्याला धडकून भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाले आहे.

या अपघातानंतर तत्परतेने बचाव कार्य करत प्रवाशांना बाहेर काढण्यात यश आलं. वाशिम जिल्ह्यात काल संध्याकाळी वनोजा कारंजा दरम्यान चॅनल क्रमांक 196 जवळ हा अपघात घडला. समृद्धी महामार्गावर सर्रास वन्य प्राण्यांचा वावर असून महामार्गावरून जाणारे हे प्राणी अपघाताला आमंत्रण देत आहेत. दुरतकर कुटुंबीय गौरी गणपतीसाठी पुण्याहून अमरावतीला या मार्गाने प्रवास करत असतांना अचानक वन्यप्राणी लावलेले कठडे ओलांडून आले. अचानक समोर आलेल्या प्राण्यांमुळे हा अपघात झाला.

या पूर्वीही या मार्गावर अनेक वन्य प्राण्यांचा वाहनांची धडक लागून मृत्यू झाला आहे. यात हरणे, नीलगायी तसेच कुत्र्यांचा समावेश आहे. या प्राण्यांमुळे वाहनांचे देखील नुकसान झाले आहे. रात्रीच्या वेळी जर एखादा प्राणी रस्त्यात आडवे आल्यास मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या मार्गावर वन्य प्राण्यांसाठी बनवण्यात आलेले ओव्हरपास आणि अंडर पास हे फोल ठरले असल्याचे देखील सिद्ध झाले आहे.

समृद्धी महामार्गावर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत लहान-मोठे 729 अपघात झाले असून त्यापैकी 47 अपघात जीवघेणे ठरले आहेत. या 47 अपघातात 101 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, इतर 99 अपघातात 262 जण गंभीररीत्या जखमी झाले आहेत. राज्य पोलिसांच्या “महामार्ग सुरक्षा” दलाने समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांचा खास अभ्यास केला असून त्या आधारावर तयार केलेल्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात महामार्ग सुरक्षा दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र सिंगल यांनी एबीपी माझाला दिलेल्या माहितीप्रमाणे समृद्धी महामार्गावर रात्रीच्या वेळेला चालकाला येणारी झोप आणि तीव्र गतीने वाहन चालवणे (over speeding) हेच अपघातांचे प्रमुख कारण आहे समृद्धी महामार्गावर सर्वाधिक बळी चालकाला येणाऱ्या झोपेमुळे गेल्याचे या अहवालात समोर आले आहे. चालकाला आलेल्या झोपेमुळे 12 अपघात घडले असून त्यामध्ये 44 जणांचा बळी गेला आहे. तर, ओव्हर स्पीडिंग म्हणजेच तीव्र गतीने वाहन चालवल्यामुळे 21 अपघात घडले असून त्यात 33 जणांचा बळी गेला आहे. टायर फुटल्यामुळे ही चार अपघात झाले असून त्यात 10 जणांचा बळी गेला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close