Uncategorized

जेवणाचे बिल मागण्यासाठी गेलेल्या वेटरला मारहाण ; 1 किमी पर्यंत फरपटत नेले

Spread the love

ओलीस ठेवून रात्रभर केली मारहाण 

बीड / नवप्रहार डेस्क 

            गरिबांचा जीव खरंच खूप स्वस्त झाला आहे काय ? कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी गरीब मिळेल ते काम करतात. पण अनेक वेळा त्यांना मोठ्या कुटुंबातील बिघडेल ओलाद कडून असभ्य वागणूक दिली जाते. त्यांना लहान सहान कारणावरून शिवीगाळ केली जाते. वेळप्रसंगी मारहाण देखील केली जाते. त्यामुळे कुटुंबासाठी नोकरी करणे म्हणजे ते फार मोठी चूक करून बसतात का असाच प्रश्न बीड येथे घडलेल्या घटनेवरून समोर येत आहे. जेवणाचे बिल घेण्यासाठी स्कॅनर गाडीजवळ घेऊन बिलाची मागणी करण्यासाठी गेलेल्या वेटरला बिल देण्यास नकार देत एक किलोमीटरपर्यंत फरपटत नेल्याची घटना समोर आली आहे.ऐवढेच नाहीतर गाडीतील तिघांनी वेटरला मारहाण करत रात्रभर ओलीस ठेवले.

मिळाळेल्या माहितीनुसार, मेहकर -पंढरपूर पालखी महामार्गावर असलेल्या एका हॉटेलमध्ये सखाराम मुंडे आणि अन्य दोघेजण जेवणासाठी चारचाकी गाडीतून आले होते. हॉटेलमध्ये पोटभर जेवण केल्यानंतर त्यांनी वेटर शेख साहिल अनुसूद्दीनला बिल घेऊन ये असं सांगितले.

 

 

 

 

वेटरने बिल दिल्यानंतर स्कॅनर घेऊन ये म्हणत तिघेजण गाडीत जाऊन बसले. वेटर स्कॅनर घेऊन गेला असता, कशाचे बिल म्हणत तिघांनी वाद घालायला सुरुवात केली. तू आमच्याकडे बिल मागतोस का? असं म्हणत चालका शेजारी बसलेल्या एकाने वेटरला दरवाजाच्या बाहेर पकडून थेट एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले.

निर्मनुष्य ठिकाणी गाडी थांबवत तिघांनी वेटरला बेदम मारहाण केली. त्यांतर वेटरच्या खिशातील 11 हजार 500 रुपयांची रक्कम हिसकावून घेतली. तसेच डोळ्याला पट्टी बांधून शनिवारी रात्रभर वेटरला गाडीमध्येच ठेवले.

दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले. याप्रकरणी तक्रारीवरुन दिंद्रुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक झालेली नाही. पुढील तपास दिंद्रुड पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close