क्राइम

पीडित महिलेने खरात विरोधात तक्रार दिल्यावर खरात ला मदत करणारे डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

Spread the love

नाशिक / विशेष प्रतिनिधी

लग्नाआधी खरात कडे गेलेल्या महिलेचा घटस्फोट झाल्या नंतर ती पुन्हा खरात कडे आली असता मी  अवतारी पुरुष आहे. आणि तुझे  दुसरे लग्न माझ्यासोबत होणार आहे. असे खोटेनाटे सांगून महिलेला काहीतरी पिण्यास देऊन तिचे लैंगिक शोषण करणाऱ्या आणि ती गर्भवती राहिल्यावर तिला गर्भ पाडायचे औषध देणाऱ्या महिलेने तक्रार केल्यानंतर गर्भ खरात याला गर्भपाताचे औषध देणारा मेडिकल स्टोअर संचालक की डॉक्टर या दिशेने तपास एजन्सी ने तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्नासाठी स्थळ आल्यानंतर संसार सुखाचा होईल का? हे विचारण्यासाठी महिला 2013 मध्ये अशोक खरातकडे गेली होती. त्यानंतर महिलेचे लग्न झाले तिला दोन मुलं देखील झाले. मात्र, नवऱ्यासोबत न पटल्याने तिने घटस्फोट घेतला.

घटस्फोटानंतर ती पुन्हा भोंदू खरातकडे गेली. तेव्हा खरातने घटस्फोट हा तुझ्या नशिबात लिहिलेला होता. मी अवतारी पुरुष आहे. माझे दुसरे लग्न तुझ्यासोबत होणार असल्याचे सांगत तांब्यातील पाणी तिला देत वेळोवेळी अत्याचार केला. ती गर्भवती राहिली असता तिला गोळ्या खाऊ घालून तिच्या गर्भपात घडवून आणला.

खरात विशिष्ट डाॅक्टर अथवा मेडीकल चालकाकडून गर्भपाताच्या गोळ्या घेत होता का? महिलांना तो विशिष्ट एका डाॅक्टरकडे पाठवत होता का? याचा तपास पोलिस करत आहेत. त्यामुळे खरातला मदत करणारा डाॅक्टर पोलिसांच्या रडारवर आल्याची चर्चा आहे.

व्हिडिओ व्हायरल, कारवाई होणार

अशोक खरातचे महिलांसोबतचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पोलिसांनी 3500 व्हिडिओ लिंक्स सोशल मीडियावरू हटवले आहेत. हे व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर पोलिस कारवाई करणार आहेत. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तब्बल 100 गुन्ह्यांची नोंद केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close