अन.. गुडगाभर पाण्यातही ते घेत होते जेवणाचा आस्वाद
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओ पैकी काही व्हिडीओ इतके मजेदार असतात की ते पाहतांना तुम्हाला हसू येते. तुमचे मनोरंजन होते आणि असे व्हिडीओ तुम्हाला कमेंट्स करण्यास बाध्य करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात लग्नाचा मंडप दिसतो आहे. मंडपात गुडगाभर पाणी आहे. तरी त्याठिकाणी लोकं जेवतांना दिसत आहेत.
जुलै महिन्यात पावसाने अनेक राज्यात हाहाकार माजवला आहे. नदी- नाले दुथडी भरुन वाहत आहेत. आणि जनजीवन विस्कळीत झाले आहे. अश्यही स्थितीत या व्हिडिओत जे दिसत आहे . ते पोट धरून हसण्याला बाध्य करत आहे
हा व्हायरल व्हिडीओ एका लग्नसमारंभातील असून यामध्ये तुम्ही पाहू शकता, लग्नाच्या संपूर्ण मंडपात गुडघ्याएवढे पाणी साचलेले आहे. तरीही अनेक मंडळी लग्नातल्या जेवणासाठी जात असल्याचे दिसत आहे. यातील काही लोक हे पाणी ओलांडताना दिसत आहेत, तर काही लोक नवीन कपडे घालून मंडपात जाताना दिसत आहेत. या व्हिडीओतील व्यक्तींना पाहून हे लोक आतमध्ये लग्नाच्या जेवणाची मेजवानी खाण्यासाठी गेल्याचे दिसत आहेत.
हा व्हायरल व्हिडीओ X(ट्विटर) वरील @छपरा जिला या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि हजारो लाइक्स मिळाल्या आहेत, तसेच अनेक जण या व्हिडीओवर कमेंट करतानादेखील दिसत आहेत.
एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की, ‘मेजवानी जिंदाबाद, लिफाफा मिळाला की नाही’, दुसऱ्या युजरने लिहिलंय की, ‘मेजवानी टाकून देण्यापेक्षा सर्वकाही खाल्लेले चांगले.’ तिसऱ्या वापरकर्त्याने लिहिलंय की, ‘आधी जेवण, बाकी सर्व नंतर’; तर आणखी एका युजरने लिहिलंय की, ‘जर अन्न खाल्ले नाही तर ते वाया जाईल.’
दरम्यान, यापूर्वीदेखील लग्नातील विविध व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. यातील एका व्हिडीओमध्ये काही तरुण मित्राच्या लग्नात सुंदर डान्स करताना दिसले होते, तर आणखी एका व्हिडीओमध्ये एक नवरी नवऱ्याला मारताना दिसली होती.