मुस्कान नववधू बनून आली आणि नावरदेवा सह कुटुंबियांच्या चेहऱ्यावरील हसू घेऊन गेली

कानपूर / नवप्रहार डेस्क
देशात मुलींच्या तुलनेत मुलींची संख्या कमी आहे. त्यामुळे प्रत्येक राज्यात लग्नाळू मुलांना मुली मिळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. राजस्थान सारख्या राज्यात जिथे स्त्रीभ्रूण हत्या झाल्या तेथील परिस्थिती तर फारच भयानक आहे. त्यामुळे आता लग्नाळू मुलाचे कुटुंबीय दलालांच्या माध्यमातून मुली शोधत आहेत. पण अनेक ठिकाणी त्यांची फसगत होत आहे. आम्ही ज्या प्रकारणाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. तेथे देखील असाच प्रकार घडला आहे.
भाजी विक्रेता असलेल्या देवेश याच्या पत्नीचं नऊ वर्षांपूर्वी निधन झालं होतं. देवेशला दुसरं लग्न करायचं होतं. दरम्यान, एका नातेवाईकाच्या माध्यमातून त्याची भेट हमीरपूर येथील रहिवासी रजनीश उर्फ पंडित आणि कानपूर रेउना येथील रहिवासी दीपक उर्फ रुद्रेश यांच्याशी झाली. दोघांनी वधूची व्यवस्था करून 70 हजार रुपयांत लग्न लावून देण्याचं सांगितलं. देवेशने ही अट मान्य केली. 15 जून रोजी रजनीश आणि दीपक दीपकला भेटण्यासाठी गेले.
देवेश आणि त्याच्या वडिलांसोबत कानपूर सेंट्रल स्टेशनला पोहोचले. दोघांना बलिया येथील मुस्कान नावाच्या महिलेसोबत भेट करून दिली. महिलेसोबत आणखी एक व्यक्ती होती. त्याचं नाव राजकुमार असून तो तिचा भाऊ असल्याचं सांगितलं गेलं. लग्न निश्चित झालं आणि 70 हजार रुपयांत व्यवहार झाला. यानंतर सर्वजण रसूलाबाद येथील धर्मगढ बाबाच्या मंदिरात पोहोचले, जिथे देवेश आणि मुस्कानने सात फेरे घातले.
मंदिरात लग्न झाल्यानंतर मुस्कान देवेशसोबत तिच्या सासरच्या घरी आली आणि तिच्या भावाला सोबत घेऊन आली. . रात्री मुस्कानने मोठ्या प्रेमाने जेवण बनवलं आणि सासरच्या मंडळींना दिलं. जेवण खाऊन सर्वजण बेशुद्ध झाले. त्यानंतर नववधू मुस्कान आणि तिचा भाऊ दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेले. रात्री 3 वाजण्याच्या सुमारास देवेश शुद्धीवर आल्यावर त्याला नववधू मुस्कान आणि तिचा भाऊ बेपत्ता असल्याचे दिसले. खोलीतील सामान विखुरलेलं होतं, ते पाहून त्याला ही बाब समजली. प्रकरण कानपूरमधील आहे.
देवेश पटकन विषधनहून कानपूरला जाणाऱ्या चौकात पोहोचला जिथे नववधू मुस्कान तिच्या भावासोबत गाडीची वाट पाहत होती. देवेशने ग्रामस्थांच्या मदतीने दोघांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. पोलीसही तत्काळ सक्रिय झाले आणि दलाल रजनीश उर्फ पंडित आणि दीपक यांना अटक केली.
पोलिसांनी पकडलेल्या वधू मुस्कानने अनेक खळबळजनक खुलासे केले आहेत. मुस्कानने दोनदा लग्न केलं असून तिला पहिल्या पतीपासून दोन मुले आहेत. ती ऑर्केस्ट्रामध्ये नाचायची. वर्षभरापूर्वी तिची राजकुमारसोबत भेट झाली. दोघांचं लग्न झालं. त्यानंतर दोघेही टोळीत सामील झाले. राजकुमार तिचा भाऊ म्हणून जात असे. मुस्कान सात वेळा वधू बनली आहे. या टोळीमध्ये एकूण 16 महिलांचा समावेश आहे, जे औरैया ते झाशीपर्यंत गुन्हे करायचे.