हटके

मृतदेहाजवळ सापडलेल्या चावीने तपासाची दारे उघडली

Spread the love

मुंबई / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                        चर्णी रोड रेल्वे मार्गावर सापडलेल्या त्या मृतदेहाच्या खिशात असलेल्या चावी मुळे पोलिसांच्या तपासाची दारे उघडली. सावित्रीबाई फुले वसतिगृहातील 19 वर्षीय विद्यार्थिनीच्या मृत्यू प्रकरणातील तो आरोपी असल्याचे उघड झाले.

मुंबई पोलिसांना चर्नी रोड रेल्वे मार्गावर ओम प्रकाश कनौजिया नावाच्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळला. त्याने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. तपासात या व्यक्तीच्या खिशात एक चावी सापडली. ही चावी सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहातील एका रुमची असल्याचं समोर आलं. त्यामुळे चर्नी रोडवरील मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नसून वसतिगृहात विवस्त्र अवस्थेत आढळलेल्या तरुणीवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणातील आरोपीचा आहे हे स्पष्ट झालं.

नेमकं प्रकरण काय?

सावित्रीबाई फुले या मुलींच्या सरकारी वसतिगृहातून विदर्भातील एक मुलगी मंगळवारपासून (६ जून) बेपत्ता होती. वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावरील तिची खोली बाहेरून लॉक होती. याबाबत माहिती मिळताच, पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून तपास केला, तर तेथे पीडित तरुणीचा विवस्त्र अवस्थेतील मृतदेह आढळला. मृतदेहाच्या गळ्याभोवती ओढणी होती. यानंतर पोलिसांनी पीडितेचा बलात्कार करून हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला.

घटना घडली तेव्हा ४५० मुलींची व्यवस्था असलेल्या या वसतिगृहात सध्या केवळ ४०-५० मुलीच राहत होत्या. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. वसतिगृहाच्या रेक्टरांनी मुलींकडून छेडछाडीची कधीही तक्रार आली नसल्याचा दावा केला. मात्र, याआधीही छेडछाड झाल्याची तक्रार एका मुलीने केली होती. त्याच मुलीने या प्रकरणाबाबत माहिती दिली.

घटना नेमकी कधी घडली?

पीडित मुलीवर बलात्कार करून हत्येची घटना नेमकी कधी घडली याबाबत निश्चित माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, पोलिसांच्या अंदाजानुसार ही घटना रात्री साडेअकरा ते पहाटे पावणेपाच वाजल्याच्या दरम्यान घडली असावी.

मुलींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

वसतिगृहातील सीसीटीव्ही बंद असणं, महिला सुरक्षारक्षक नसणं, वसतिगृहाचे गेट रात्रीच्यावेळी आतून बंद असणे अपेक्षित असताना आरोपीला प्रवेश मिळणे या प्रकारांनी या वसतिगृहातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांचे जबाब नोंदवले आहेत. विशेष म्हणजे आरोपीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी अद्याप समोर आलेली नाही. त्याच्यावर आधी कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close