क्राइम

तरोडा येथील घटनेच्या अनुषंगाने अवैध गावठी दारू अड्ड्यावर पोलिसांची धडक कार्यवाही

Spread the love

४लाख६८ हजाराचा मुद्देमाल नष्ट

मोर्शी(तालुका प्रतिनिधी)

दि.१९ जुलै रोजी मोर्शी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडा धानोरा येथील दोन इसमाचा विषारी गावठी दारु सेवनामुळे मृत्यु झाला होता. त्याप्रमाणे सिताराम शेषराव परतेती, वय ३७ ,वर्ष सुंदा मयाराम धुर्वे, वय ६५ वर्षे, सौ. सिंधु इसम धुर्वे, वय ४५ वर्ष, सुखदेव जिवता उईके, सुमेलाल शाम कुमरे रा.सर्व तरोडा यांची दारू प्याल्याने त्यांची प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जिल्हा सामान्य रूग्णालय, अमरावती येथे दाखल करण्यात आले आहे. सद्यस्थितीत सर्वाची प्रकृती स्थिर व धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले आहे.
घटनेचे गांर्भिय बघता अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी अमरावती राज्याच्या सिमेलगत असलेल्या मध्यप्रदेश येथील बेतुल जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेशी समन्वय साधुन अमरावती ग्रामीण व बेतुल जिल्हा पोलीसांद्वारे अवैध गावठी दारू विरुध्द शुक्रवारी विशेष मोहिम राबविण्यात आली. सदर मोहिमे दरम्यान अमरावती जिल्हयातील मध्यप्रदेश सिमेला लागून असलेले पोलीस स्टेशन मोर्शी, बेनोडा, वरुड शे. घाट, शिरजगांव, ब्राम्हणवाडा येथील प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच मध्यप्रदेश येथील पोलीस स्टेशन आठनेर, भैसदेही सिमेलगतचे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व अंमलदार, स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार असे सामील झाले होते. मोहिमे दरम्यान पोलीस स्टेशन शेंदुरजना घाट – २, पोलीस स्टेशन वरुड २, पोलीस स्टेशन बेनोडा ३, ब्राम्हणवाडा थंडी-४ येथे गुन्हे नोंद करण्यात आले असून मध्यप्रदेश महाराष्ट्र सिमेलगतच्या डोंगराळ प्रदेश, जंगल, नदीपात्र तसेच शेतशिवार येथे गावठी दारु काढण्याचे उद्देशाने साठवून ठेवण्यात आलेला मोहमास सडवा मोठया प्रमाणात नष्ट करण्यात आलेला आहे. सदर मोहिमे दरम्यान मोहमास सडवा कि. अं. ४ लाख,६८ हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.
गुरुवार दि १९ रोजी पोलीस स्टेशन मोर्शी येथे घडलेल्या गुन्हयांचे अनुषंगाने मोर्शी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. निलेश पांडे हे तपास करीत असून तपासा दरम्यान सदर गुन्हयात पिडीत व्यक्तींनी प्राशन केलेली गावठी दारू ही पो.स्टे. आठनेर, जि. बैतुल, मध्यप्रदेश हद्दीमध्ये शामजी जिवन उईके रा. भिवकुंडी या अवैधरित्या तयार केली असून राजकुमार सुरेश साबळे रा. तरोडा याने गुन्हयातील मयत मयाराम धुर्वे याचे घरी वाहतुक करुन पोहचवून दिल्याचे निष्पन्न झाल्याने व दारुची निर्मित व वाहतुक करणाऱ्या दोनही इसमांना सदर गुन्हयात आरोपी करण्यात आले असून अटक करण्यात आली आहे.
घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने तरोडा व भिवकुंडी येथील दारू प्राशन करणा-या २७ नागरीकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असता त्यांना कोणतीही लक्षणे आढळुन आलेली नाही. तसेच आणखी काही नागरीकांनी मद्य प्राशन केले होते का याची सुध्दा तपासणी करण्यात येत आहे.
सदर प्रकारच्या घटनांना आळा बसण्याकरीता अमरावती जिल्हा बैतुल मध्येप्रदेश येथील पोलीस संयुक्त पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, आरसीपी पथक यांच्याद्वारे सिमेलगतच्या भागात सतत अभियान चालवून गावठी दारु, निर्मिती, विक्री व वाहतुक याचा समुळ नाश करण्यात येनार आहे.
अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ , शशिकांत सातव, अपर पोलीस अधिक्षक हे स्वतः सदर अभियानाकडे जातीने लक्ष ठेवून आहेत. सदर मोहीमेत मध्यप्रदेश व महाराष्ट्र येथील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सक्रीय सहभाग घेतला आहे.
व्यसनापोटी जिव धोक्यात घालून दारू सारख्या गोष्टींना बळी न पडण्याचे आवाहन जिल्हा प्रशासना तर्फे सर्व नागरीकांना करण्यात येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close