ग्रामपंचायत भांबोरा यांना स्वातंत्र दिनी शिवाजी महाराज यांचा फोटोचा विसर .
यवतमाळ / प्रतिनिधी
ग्रामपंचायत, सरकारी दवाखाना,व प्रा.म.शाळा या तिन्ही ठिकाणी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो थोर पुरुषांच्या फोटो सोबत वापरला नाही.
आज १५ऑगष्ट २०२३ रोजी स्वातंत्राला ७६ वर्ष झाले परंतु या दिनी हिंदवी स्वराज्याचे जनक बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांचा विसर ग्रामपंचायत भांबोरा यांना झाला असे दिसते. कारण गावातील ग्रामपंचायत, प्रा.म.शाळा व सरकारी दवाखाना या तीन ठिकाणी महोत्सव साजरा होतो परंतु या तीनही ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो दिसला नाही. हा योगायोग म्हणावं की मुद्दामून करण्यात आले असा प्रश्न जनतेला पडला आहे या घटनेमुळे महाराजांच्या मावळ्याच्या भावना दुखावल्या गेल्या आहे.त्यामुळे संबंधित सरपंच, मुख्याध्यापक,व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर महापुरुषाची विटंबना केल्याप्रकारणी गुन्हा दाखल करून कार्यवाही करावी व यांना सार्वजनिक ठिकाणी जनतेची माफी मागावी अन्यथा भांबोरा गावातील नागरिक आंदोलन करतील असा इशारा नागरिकांनी दिला.