सामाजिक

न.प. बगिच्यात संत शिरोमणि नामदेव महाराज पुतळा उभारावा

Spread the love

 

घाटंजी शिंपी समाजने केली मुख्याधिकारी यांना मागणी

घाटंजी ता प्रतिनीधी-
दी.22/7/24 रोजी घाटंजी ता. शिंपी समाज संघटना व सामाजिक कार्यकर्ते यांनी न.प.मुख्याधिकारी राजु मोट्टेमवार यांना लिखीत स्वरुपात घाटंजी मुख्य वस्तितील बगिच्या मधे वारकरी संप्रदायाचे प्रसार, प्रचार, समाज जागृती करणारे थोर संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या पुतळ्याची उभारणी करण्यात यावी याबाबत निवेदन देण्यात आले. ‘नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी’ म्हणत आपल्या अभंग,कीर्तन भजनाच्या माध्यमातून महाराष्ट्र पासून त पंजाब पर्यंत जनजागृती करणा-या संताप्रति एक मानवंदना स्थळ या मुर्तीच्या माध्यमातून बगिच्यात उभारल्या जाईल. या उदेशातून ही मागणी करण्यात आली आहे. सदर मागणीचे निवेदन देतांना सचिन कर्णेवार, विजय दीकुंडवार,शंकर पोटपील्लेवार, संजय दीकुंडवार, काशिनाथ नोमुलवार,उमेश अक्केवार,संदीप पोटपील्लेवार, लक्ष्मण कर्णेवार, आशिष कर्णेवार, विनायक गिरी,विलास गटलेवार सह ईतरही शिंपी समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
०००००००००००००००००००
फोटो

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close