सामाजिक
त्याने तिला गोष्टीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला पण निरर्थक ठरला


पुणे / विशेष प्रतिनिधी
पीएचडी करणाऱ्या तरुणीने आपले आयुष्य संपवण्याचा दुर्दैवी निर्णय घेत गळफास लावून आत्महत्या केली. त्यापूर्वी तिने आपल्या मित्राला कॉल केला. मित्राने तिला गोष्टीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला.पण तो जेव्हा तरुणीच्या घरी पोहचला त्यावेळी सगळेच संपले होते. भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल झाली आहे.
गाईड च्या त्रासाला कंटाळून तिने हा निर्णय घेतल्याचा आरोप तरुणीच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकरणी बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचा प्राध्यापक सहाय्यक संचालक असलेल्या ड़क्टर ए बिन्नियमिनला अटक करण्यात आलीय.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, तरुणी शाहूनगर इथं राहत होती. ती बॉटनी विषयात बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया इथं पीएचडी करत होती. प्राध्यापक बिन्नियमिन हे तिचे गाइड होते. तरुणीनं गळफास घेण्याआधी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत बिन्नियमिन गैरवर्तन आणि मानसिक त्रास देत असल्याचं म्हटलं होतं. या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलत असल्याचंही त्यात म्हटलं आहे.
तरुणीच्या आत्महत्येआधी दोन दिवसांपूर्वी प्राध्यापक बिन्नियमिन याने स्टॅम्प पेपरवर असा प्रकार पुन्हा करणार नसल्याचं लिहून दिलं होतं. आता माझी चूक झाली असंही म्हटलं होतं. प्राध्यापकाने जरी लिहून दिलं तरी तरुणी मानसिक धक्क्यात होती. यातूनच तिनं आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
आत्महत्या करत असल्याचं तरुणीने मित्राला फोनवरून सांगितलं. तेव्हा मित्राने तिला बोलण्यात गुंतवून तिच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या घरी पोहोचेपर्यंत सगळं संपलं होतं. आता या प्रकरणी बिन्नियमिनला अटक करण्यात आलीय. त्याला १५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
| Cookie | Duration | Description |
|---|---|---|
| cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
| cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
| cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
| cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
| cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
| viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |
No WhatsApp Number Found!