सामाजिक

रंग विक्रीसाठी सजली अंजनगावची बाजार पेठ

Spread the love

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे

होळी धुलीवंदन काही तासावर येऊन ठेपल्याने बाजारात विविध आकारातील पिचकारी विविध रंग. मास. आणि इतर साहित्य दाखल झाले आहे. ग्राहकांची मागणी देखील वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांची रेलचेल दिसून येत आहे. विशेष विविध आकारातील पिचकारी बालचंबुना आकर्षित करून लागले आहेत. यावर्षी पाच ते दहा टक्क्यांनी रंगाच्या किमतीत वाढल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. होळीच्या सणासाठी गुलाबी निळा. जांभळा. भगवा. नारिंगी. पिवळा. यासह नैसर्गिक रंग विक्रीसाठी ठेवले आहेत. त्याच बरोबर पावडर कलरही उपलब्ध झाले आहे. पावडर कलरचा अधिक वापर केला जातो त्यामुळे पंधरा ते पंचवीस किलो पावडर बॅग ची मागणी वाढत आहे. होळीचे साहित्य दाखल झाले आहे .बाजारात विविध रंगाच्या आणि आकाराच्या पिचकारी दाखल झाल्या आहेत. बालचमुना आकर्षित करतील अशा पिच्कार्‍यांच्या विक्रीसाठी ठेवल्या आहेत. मात्र यामध्ये छोट्या
– – –
भीम पिचकारीची क्रेझ निर्माण झाली आहे या पिचकारीला मागणी वाढू लागली आहे . रंगाच्या हालचालीप्रमाणे तुमचे डोळे नाक तोंडात रसायन गेल्याने ते तुमच्या शरीराला हानिकारक ठरेल लहान मुलांपासून दूर ठेवा याचा वापर केवळ औद्योगिक क्षेत्रात रंग कामांसाठी करावा आम्ही जबाबदारी स्वीकारत नाही अशी सूचना लिहून उत्पादक कंम्नी मात्र जबाबदारी झटकत आहे . सध्या बाजारात रंगपंचमीनिमित्त विविध कलरचे बॉक्स विक्रीस आल्या आहेत. अवघ्या चाळीस रुपयांना 100 ग्रॅम वजनाच्या रंगाचा डब्यावर ना उत्पादनाचे नाव आहे ना किंमत फॉर इंडस्ट्रिलर युज ओन्ली असा सल्ला दिला आहे . त्यासोबतच
. – =
होळी या सणा करीता गाठीचा गोडवा वाढतोय गाठी सुमारे 100 ते 110 रुपये किलोने विकल्या जात आहे. दहा ते वीस रुपये एक हार पन्नास ते साठ रुपये आणि यापुढे वजनानुसार नगानुसार गाठी हार बाजारात उपलब्ध असल्याचे दिसुन येत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close