पप्पू पाटील यांना मनसे कडून अमरावती विधानसभेचे उमेदवारी जाहीर..
उमेदवारी जाहीर होताच पक्ष कार्यालय या ठिकाणी जल्लोष…
अमरावती / प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतानाच इतर सर्व पक्षांच्या उमेदवारी जाहीर होत आहे त्यामध्ये राज साहेब ठाकरे यांनी ‘ ना आघाडी ना युती ‘ अशा प्रकारचा नारा दिल्यानंतर पक्षाचे तिसऱ्या क्रमांकाची यादी आज प्रकाशित झाली त्यामध्ये मनपा माजी सभापती असलेले पप्पू पाटील यांना मनसे कडून अमरावती विधानसभेची तिकीट जाहीर झाली. त्यावेळी सर्व पदाधिकारी यांच्याकडून घोषणा तसेच फटाक्यांची अतिशबाजी करून उत्साहात जणू आनंदोत्सवच साजरा करण्यात आला, पप्पू पाटील यांनी सुद्धा या संधीबाबतीत राज साहेब ठाकरे यांचे आभार मानले, सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे वाटून उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल जल्लोष साजरा केला आणि यावेळेस अमरावती विधानसभेवर परिवर्तन घडवून आणण्याबाबत निश्चय केला..