बिझनेस

आता बाईक देखील CNG : असा असेल मायलेज 

Spread the love

                प्रदूषणामुळे पर्यावरणाला होत असलेला धोका लक्षात घेता डिझेल, पेट्रोल वर चालणाऱ्या गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारचा निर्णय पाहता चारचाकी गाड्या बनवणाऱ्या कंपन्यांनी आता इलेक्ट्रिक आणि CNG वर चालणाऱ्या गाड्या निर्मिती सुरू केली आहे. अल्पावधीतच तुम्हाला रस्त्यावर CNG बाईक धावतांना दिसणार आहे.

देशातील पहिली सीएनजी (CNG ) मोटारसायकल लॉन्चची तयारी पूर्ण झाली आहे. येत्या जून महिन्यात ही मोटारसायकल बाजारात येणार असल्याचे कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक राजीव बजाज यांनी म्हटले आहे.

ही मोटारसायकल बजाज कंपनीकडून तयार केली गेली आहे. सीएनजीवर असणारी ही मोटारसायकल भारतीय वाहन बाजारात नवीन क्रांती घडवणार आहे. कारण पेट्रोलपेक्षा सीएनजीची किंमत कमी असते.

काय आहेत CNG मोटारसायकलचे फिचर्स

बजाजकडे प्लॅटिना आणि CT मोटारसायकल सर्वाधिक मायलेज देणाऱ्या गाड्या आहेत. त्यापेक्षाही जास्त सीएनजी गाडीचे मायलेज असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामध्ये 110cc चे इंजिन लावण्याची शक्यता आहे. यापूर्वी बजाजच्या प्लॅटिना गाडीत 110cc आणि CT 110X इंजिन होते. हे इंजिन 6-स्पीड गिअरबॉक्ससोबत जोडले जाणार आहे.

किती देणार मायलेज

बजाजच्या या सीएनजी मोटारसायकलला बायो-इंधन सेटअप मिळणार आहे. या बाइकमध्ये एक डेडिकेटेड स्विच मिळण्याची शक्यता आहे. यामुळे CNG वरून पेट्रोल किंवा पेट्रोलवरून CNG वर स्विच करता येईल. सीएनजी टाकी सीटच्या खाली असेल, तर पेट्रोलची टाकी सामान्य स्थितीत असेल. एकूणच, बजाजच्या सीएनजी मोटरसायकलचा हा दर्जा अधिक चांगला असणार आहे. एक किलो CNG मध्ये ही बाईक 100 ते 120 Km मायलेज देऊ शकते.

बजाज ईव्ही, इथेनॉल, एलपीजी आणि सीएनजी गाड्यांवर भर देत आहे. एका वर्षात सुमारे 1 ते 1.20 लाख CNG बाइक्सचे उत्पादन करणार आहे. या गाड्यांची किंमत सुमारे एक लाख रुपये असण्याची शक्यता आहे. सीएनजी मोटारसायकलचे उत्पादन संभाजीनगरमधील प्लँटमध्ये केले जात आहे.

या गाडीला 17-इंच चाके आणि दोन्ही टोकांना 80/100 ट्यूबलेस टायर असण्याची शक्यता आहे. फ्रंट डिस्क आणि रियर ड्रम कॉम्बो कॉम्बिनेशनसह असणार आहे. सस्पेंशन सेटअपमध्ये समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि मागील बाजूस मोनोशॉक युनिट असेल. त्याचे एबीएस आणि नॉन-एबीएस व्हेरिएंट दोन्ही ऑफर केले जाऊ शकतात. CNG मोटरसायकलला गीअर इंडिकेटर, गियर मार्गदर्शन आणि ABS इंडिकेटर यासारखे फिचर्स असणार आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Back to top button
Close
Close