पारवा येथे कृषी योजनांचा माहिती मेळावा संपन्न
स्व वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त मेळावा आयोजित.
घाटंजी तालुका प्रतिनिधी -सचिन कर्णेवार
दिनांक 23/8/2023 रोजी मौजा पारवा तालुका घाटंजी येथील ग्रामपंचायत सभागृहात दिनांक 12 /8 /2023 ते 24 /8/ 2023 या कालावधीत स्व. वसंतराव नाईक यांच्या पुण्यतिथीनिमित्त कृषी योजनांचा मेळावा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. गणेश मुद्दलवार आत्मा समिती घाटंजी,श्री निकम सर अध्यक्ष तंटामुक्ती समिती पारवा, उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ माननीय श्री जे.आर. राठोड साहेब उपविभागीय कृषी अधिकारी यवतमाळ हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तर श्री एस. एस. राठोड साहेब तालुका कृषी अधिकारी,घाटंजी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.कृषी योजनांचा माहिती मेळावा योजनांचा कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक माननीय श्री जे.आर. राठोड साहेब उपविभागीय कृषी अधिकारी, यवतमाळ यांनी उपस्थित शेतकऱ्यांना देताना स्प्रिंकलर,ठिबक,कृषी यांत्रिकीकरण, महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळबाग लावणी,भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड, शेडनेट,प्लास्टिक मल्चिंग, पॉलिहाऊस उभारणी,मुख्यमंत्री शाश्वत सिंचन कार्यक्रम अंतर्गत शेततळे,तसेच प्रधानमंत्री सुष्म अन्नप्रक्रिया उद्योग विषयी उपस्थित शेतक-यांना सविस्तर मार्गदर्शन केले.मौजे येथील उत्पादकता लक्षात घेता विशेष शेतकरी प्रशिक्षण PMFME योजनेअंतर्गत राबविण्याच्या बाबत् उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना निर्देश देण्यात आले. सदर कार्यक्रमात शेतकऱ्यांना कापूस,तूर सोयाबीन कीड व रोग व्यवस्थापना बाबत शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास श्री पि. डी. अक्कलवार मंडळ कृषी अधिकारी पारवा,श्री आर.बी.चांदुरकर कृषी पर्यवेक्षक पारवा,कार्यक्रमाच्या यशासाठी श्री. लालाजी पोटपिल्लीवार ग्रामपंचायत सदस्य,श्री. डी. ए. मेश्राम कृषी सहाय्यक पारवा, श्री. एस. देशेट्टीवार कृषी सहाय्यक सावरगाव, श्री. ए.टी. खरुडकर यांनी विशेष प्रयत्न केले व शेतकऱ्याच्या उपस्थितीने कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.