सामाजिक

प्रेयसीने दिला धोका ; तरुणाने उचलेले टोकाचे पाऊल 

Spread the love

नागपूर / विशेष प्रतिनिधी 

              मागील सहा वर्षांपासून प्रेमात असलेल्या तरुणाला त्याच्या प्रेयसी ने धोका दिल्याने मानसिक रित्या खचलेल्या तरुणाने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. घटना सीताबर्डी परिसरातील एका हॉटेल मध्ये घडली असून तन्मय राजेंद्र कोरे (२७ रा. भंडारा) असे युवकाचे नाव आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, तन्मय हा नेहरू गार्डनजवळील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता.काही दिवसांपूर्वीच तो भंडाऱ्यातून नागपूरला आला होता. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, काही महिन्यांपूर्वी तिने त्याला नकार दिला होता.

त्यामुळे तो तणावात होता. याबाबत नातेवाईकांनीही त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्यास तयार नव्हता. यामुळे तणावात आला आणि युवतीच्या शोधात नागपुरात एका हॉटेलमध्ये वास्तव्यास होता.

रात्री जेवण करून तो झोपी गेला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी तो खोलीतून बाहेर आला नाही. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना संशय आल्याने हॉटेल कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. त्याने नेमकी कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे कळू शकले नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close