क्राइम

शहरातील अनेक भागात रस्त्यांची व नाल्यांची दुरावस्था व स्वच्छता करीता आम आदमी पार्टी तर्फे जिल्हाधिकारी ला निवेदन देण्यात आले

Spread the love

 

यवतमाळ-
मागील काही वर्ष मध्ये संपूर्ण यवतमाळ शहराची दुरावस्था झाली आहेत. रस्त्यांची दुर्दशा झाली आहेत, अधिकतर भागात सोबतच शहरातील प्रमुख भागात रस्ते खराब झाले आहेत व रस्त्यावर ठीक ठिकाणी गड्डे पडलेले आहेत. अधिकतर भागात नाल्यांची दुर्दशा झाली आहेत व आदिवासी सोसायटी, प्रभात नगर, सारस्वत लेआऊट,समता नगर, बोरले नगर, पचगाडे लेआऊट, विदर्भ हाऊससिंग,आठवले लेआऊट,वैभव नगर,स्वस्तिक नगर,पाठीपुरा सुरज नगर,वडगाव,पिंपळगाव कावेरी पार्क सह अनेक भागात नाल्या नसल्याने व ज्या ठिकाणी नाल्या आहेत तिथे स्वच्छताचे कार्य नसल्याने व अनेक ठिकाणी नाल्यांची दुरावस्था झाल्या मुळे परिसरातील जनता त्रस्त झाली आहेत. शहरातील अनेक प्रमुख ठिकाणी क्रिटिकेयरे दवाखान्या,समोर साबू दवाखान्याच्या समोरील रस्त्यांची दुरावस्था झाली आहेत. शहरात गुनेगारी वाढल्या मुळे अनेक प्रभागातील रस्त्यांवर पथदिवे नसल्याने जनते मध्ये रात्रीच्या वेळेस आवाजाही ला भीतीचा माहोल निर्माण झालेला आहेत. शहराची दुरावस्था झालेली आहेत परंतु अनेक निवेदन देऊन सुद्धा दखल घेतल्या जात नाही. मालमत्ता करच्या स्वरूपात मोठे प्रमाणात कर वसुलण्यात येते परंतु कोणतीच सोय सुविधा शहरातील परिसरातील लोकांना पुरवण्यात येत नाही. वृक्षारोपण कर वसुलण्यात येते परंतु अनेक ओपन ग्राउंड मध्ये स्वच्छता व शहरातील अनेक ठिकाणी स्वच्छता व सौंदर्यकरणचा कार्य कधीच राबवल्या जात नाही. शिक्षण कर वसुलण्यात येते परंतु नगर परिषद शाळां मध्ये शिक्षण अवस्था चतुर्थ श्रेणीची झालेली दिसून पडते, केंद्र सरकार तर्फे स्वच्छता अभियानचा धिंडोरा पिठल्या जाते परंतु यवतमाळ शहरातील दुरावस्था बघता यवतमाळ नगरपरिषदची स्वच्छता व अनेक समस्या बद्दल निष्काळजीपणा स्पष्ट दिसून पडते. शहरातील रस्त्यांची दुरावस्था,नाल्यांची दुरावस्था व स्वच्छता सौंदर्यकरण सोबतच अनेक समस्या बद्दल दखल घेने करीता आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी ला निवेदन देण्यात आले व दखल न घेतल्यास कायदे पूर्वक आंदोलनाचा ईशारा आम आदमी पक्षाच्या वतीने देण्यात आले. या वेळी आम आदमी पक्षाचे
गुणवंत इंदूरकर,आकाश चमेडीया, शुभम चांदेकर,प्रशांत देवकते, सचिन शेळके, अविनाश धनेवार, नामदेव इंगळे, हरिदास नेताम, निलेश नांदुरकर, जानराव टिकले, बबनराव पाळवे, ऋषी नथवानी व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close