राजकिय

काँग्रेस मध्ये हाय होलटेज ड्रामा ; काँग्रेस कडून तिकीट जाहीर झाल्यावर उमेदवाराने नाकारले

Spread the love

काँग्रेस कडून तिकीट जाहीर झाल्यावर उमेदवाराने नाकारले

मुंबई / नवप्रहार डेस्क

                        निवडणुकीच्या तारखेची घोषणा झाल्यावर सगळेच पक्ष योग्य उमेदवार देण्याच्या तयारीला लागले आहेत. अनेक पक्षाचीउमेदवारांची  दुसरी आणि तिसरी लिस्ट जाहीर झाली आहे. परंतु काँग्रेस ची तिसरी लिस्ट जाहीर होताच हाय होलटेज ड्रामा पाहायला मिळाला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यावर उमदेवराने तिकीट नाकारत ते परत केले आहे. सचिन सावंत असे त्यांचे नाव असून ते काँग्रेस प्रवक्ते आहेत.

. सचिन सावंत यांनी आपली उमेदवारी माघारी घ्यावी अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्येही खळबळ उडाली आहे.

एक्सवर पोस्ट लिहीत सचिन सावंत म्हणाले, “मी वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघातून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. तीथेच लढावे अशी माझी इच्छा होती. परंतु तो मतदारसंघ शिवसेना उबाठा पक्षाकडे गेला आहे. मी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मागितली नव्हती. तरी पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मनापासून धन्यवाद! परंतु मी महाराष्ट्र काँग्रेस पक्षाचे प्रभारी रमेश चेन्निथला यांना पक्षाने निर्णय बदलावा याकरिता विनंती केली आहे. मी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठी माझ्या विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करतील ही आशा बाळगतो.”

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close