सामाजिक

अनेक खुबी असलेला विवो चा फोन झाला लॉन्च ; किंमत पाहून व्हाल हैरान

Spread the love

नवी दिल्ली  / प्रतिनिधी

Vivo G2 चीनमध्ये लॉन्च करण्यात आलाय. हा कंपनीचा नवा बजेट स्मार्टफोन आहे. या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंचांचा LCD डिस्प्ले देण्यात आलाय. यासोबतच हा फोन MediaTek’s Dimensity 6020 प्रोसेसरवर चालतो. याची बॅटरी 5,000mAh ची आहे. हा फोन अँड्रॉइड 13 बेस्ड OriginOS 3 वर चालतो.

Vivo G2 च्या 4GB रॅम + 128GB व्हेरिएंटची किंमत CNY 1,199 (जवळपास 14,000 रुपये), 6GB + 128GB व्हेरिएंटसाठी CNY 1,499 (जवळपास 17,500 रुपये) आणि 8GB+ 128GB व्हेरिएंटसाठी CNY 1,599 (जवळपास 18,700 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर यामध्ये 8GB + 256GB व्हेरिएंटसाठी किंमत CNY 1,899 (जवळपास 22,200 रुपये) ठरवण्यात आली आहे. ग्राहक हा फोन चीनमध्ये सिंगल स्पेस ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये खरेदी करु शकता. सध्या वीवोच्या आणि भारतासह विविध बाजरांमध्ये या फोनच्या लॉन्चिंगविषयी काही सांगण्यात आलेलं नाही.

Vivo G2 चे स्पेसिफिकेशन्स
ड्यूअल-सिम (नॅनो) सपोर्टचा हा स्मार्टफोन अँड्रॉइड 13 बेस्ड OriginOS 3 वर चालतो. यामध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.56-इंच HD+ (720×1,612 पिक्सल) IPS LCD डिस्प्ले देण्यात आलाय. तर या हँडसेटमध्ये 8GB पर्यंत LPDDR4x रॅमसह 7nm Dimensity 6020 प्रोसेसरही उपलब्ध आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनच्या रियरमध्ये 13MP प्रायमरी कॅमेरा आणि 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय. कनेक्टिव्हिटीच्या हिशोबाने फोनमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 5, Bluetooth 5.1, GPS,एक USB Type-C पोर्ट आणि एक 3.5mm हेडफोन जॅकचा सपोर्टही देण्यात आलाय. या हँडसेटची बॅटरी 5,000mAh ची आहे. येथे 15W चार्जिंग सपोर्टही देण्यात आलाय. या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर साइडमाउंडेट आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close