विदेश

अमेरिकन युद्धनौका सेंट्रल कमांड क्षेत्रात ; तणाव वाढला

Spread the love

                 अमेरिका आणि इराण मध्ये मागील काही दिवसांपासून तणाव आहे. अमेरिकेने इराण वर हल्ल्याची धमकी दिली होती. इराण ने देखील आम्ही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देऊ असे म्हटले आहे. त्यामुळें या दोन देशात युद्ध भडकण्याचे बोलल्या जात आहे.  मंगळवारी अरबी समुद्रात इराणचे एक ड्रोन पाडल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकन वॉरशिप USS अब्राहम लिंकनकडे हे ड्रोन जात असताना त्याला अमेरिकन सैनिकांनी पाहिले. त्यानंतर अमेरिकेचे F-35 लढाऊ विमानाने झेप घेत या ड्रोनला हवेत नष्ट केले.

ही घटना अशा वेळी घडली आहे ज्यावेळी अमेरिका आणि इराणमध्ये तणाव वाढला आहे. अमेरिकेने मध्य पूर्वेत आपल्या सैन्याची जमावजमव वाढवली आहे.त्यामुळे आता इराण कोणते पाऊल उचलते याकडे लक्ष लागले आहे.

अमेरिकन नौदलाने एअरक्राफ्ट कॅरियर स्टाईक ग्रुप USS अब्राहम लिंकन आणि अनेक गायडेड मिसाईल डेस्ट्रॉयर या भागात तैनात केली आहे. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणवरील हल्ल्या संदर्भात अद्याप कोणताही अंतिम निर्णय घेतलेला नाही. दुसरीकडे इराणने कठोर भूमिका घेतली आहे. इराणने इशारा देत जर अमेरिकेने हल्ला केला तर तो संपूर्ण मध्य पूर्वेत अमेरिकन ठिकाणांना आणि इस्राईलला टार्गेट करु शकतो.

अमेरिकेने दिला होता इशारा

३० जानेवारीला इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीत दोन दिवसांचा नौदलाचा सराव करण्याची घोषणा केली होती. दुसऱ्या दिवशी, यूएस सेंट्रल कमांड (CENTCOM) ने इराणच्या IRGC ला समुद्रात तणाव वाढवू शकणाऱ्या मोहिमामध्ये सहभागी होण्यापासून दूर रहाण्याचे निर्देश दिले. इराणने हे सराव सुरक्षितपणे आणि आंतरराष्ट्रीय जहाजांना धोका न पोहचवता करावेत असा सल्ला अमेरिकेने दिला होता. होर्मुझची सामुद्रधुनी हा एक महत्त्वाचा सागरी मार्ग आहे, ज्यामधून दररोज सुमारे १०० व्यापारी जहाजे मार्गक्रमण करतात. जगाच्या सुमारे २०% तेल पुरवठा या मार्गातून होत असतो.

इराणला आंतरराष्ट्रीय जलक्षेत्र आणि हवाई क्षेत्रात काम करण्याचा अधिकार आहे, परंतु अमेरिकन सैन्य किंवा व्यापारी जहाजांजवळील कोणतीही कृती संघर्ष आणि तणाव वाढवू शकतात असा इशारा अमेरिकेने दिला होता. आम्ही आपल्या सैन्याचे, जहाजांचे आणि विमानांचे संरक्षण करणार असेही अमेरिकेने म्हटले होते.अमेरिकन जहाजांजवळील कोणतेही सशस्त्र उड्डाणे, हाय-स्पीड बोटी किंवा शस्त्रे अमेरिका सहन करणार नाही असेही अमेरिकेने म्हटले होते.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडमध्ये २१ देश

CENTCOM अर्थात अमेरिकन सेंट्रल कमांडमध्ये मध्य पूर्व, दक्षिण आशिया आणि मध्य आशियातील अनेक भाग आहेत. त्यात इजिप्त, इराण, इस्रायल आणि पाकिस्तान सारखे देश समाविष्ट आहेत. या प्रदेशात होर्मुझची सामुद्रधुनी, सुएझ कालवा आणि बाब अल-मंडेब सारखे महत्त्वाचे सागरी मार्ग देखील समाविष्ट आहेत.

या प्रदेशात तणाव वाढला

अमेरिकेची विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन देखील २६ जानेवारी रोजी सेंट्रल कमांड क्षेत्रात आली. सुरक्षेच्या कारणास्तव अमेरिकेने त्याच्या सरावाची कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. दोन्ही देश त्यांची लष्करी ताकद दाखवत आहेत आणि पर्शियन आखातात एकमेकांना इशारा देत आहेत. अमेरिका आणि इराणच्या लष्करी कारवायांमुळे या प्रदेशात तणाव वाढला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close