श्री क्षेत्र शेगाव पायदळ वारीत 1600 वारकऱ्यांचा सहभाग
अकोला / प्रमोद मोहरील
काल 26 जानेवारी निमित्य श्रीं संत गजानन महाराज मंदिर, शिवर द्वारा आयोजित भव्य दिव्य श्री क्षेत्र शिवर तें श्री क्षेत्र शेंगाव,पायदळ वारी काल खूपच भक्तिमय वातावरणात पार पडली.
या दिंडी मध्ये जवळपास 1600 वारकरी सहभागी झाले होते, दिंडीचे अकोला शहरामध्ये ठीक ठिकाणी लोक प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक, वैद्यकीय क्षेत्रातील नामांकित मंडळी, व्यापारी वर्गातील नामांकित व सर्व श्रीं भक्त मंडळींनी खूपच भक्ती भावाने स्वागत करून दिंडी मधील रथ व श्रीं च्या चरण पादुकांचें पूजन केले.
दिंडी मार्गक्रमण होत असता पूर्ण रस्त्याने रांगोळी, पुष्प वर्षावं , अनेक ठिकाणी मंडप स्टेज, पूर्ण चौका चौकात आनंदाचा वर्षावं करून स्वागत करण्यात आले.
दिंडी मार्गा मध्ये अनेकानेक ठिकाणी, पोहा, गुळाचा शिरा, समोसा, कचोरी, ढोकला, बिस्कीट, वेफर, केळे,व पाणी बॉटल वाटप करण्यात आले. तसेच दिंडी मधील वारकऱ्यांची महाप्रसाद व्यवस्था ही डाबकी रोड वारील देशमुख मंगल कार्यालय येथे करण्यात आली होती.
1600 वारकऱ्याच्या या भव्य दिव्य दिंडीचे पूर्ण नियोजन हे श्री संत गजानन महाराज सेवा समिती शिवर कडून एकदम शिस्तीत व नियमात करण्यात आलेले होते.
या वेळेस सेवाधारी मंडळीनच्या वेग वेगळ्या समितीची नेमणूक करण्यात आलेली होती. या सर्व मंडळींनी आपली आपली सेवा एवढी कर्तव्य दक्ष पणे केली कीं दिंडी पाहणारे प्रत्येक्ष दर्शी चां आंनद आणखी द्विगुणित झाले.