मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनच्या लाभार्थीसाठी न.प. घाटंजीने लावला तिन दीवसीय निशुल्क शिबीर
मुख्याधिकारी राजू मोट्टेमवार यांच्या संकल्पनेतून शिबीराचे आयोजण
शिबीरास महीला लाभार्थिचा भरभरुन प्रतिसाद
घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी नगर परिषद व महाबलाय व्यायम शाळा घाटंजी च्या संयुक्त विद्यमाने दी.८/७/२४ रोजी सांस्कृतिक भवण येथे तिन दीवसीय शिबीर आयोजित करण्यात आले. नुक्तीच २८ जुलै रोजी जाहीर करण्यात आलेली मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ या योजनेचा घाटंजी तालुक्यातील सर्व महीला लाभार्थि वर्गास लाभ मिळावा आणि अशिक्षित,मजूर,वयोवृद्ध महीलांना या लाभापासून वंचित न राहता त्याचा फायदा व्हावा या साठी घाटंजीत हा कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रम अध्यक्ष स्थानी माजि नगर परिषद अध्यक्षा सौ नैना शैलेश ठाकुर होत्या,तर प्रमुख पाहूणे तथा मार्गदर्शक मा. विजय साळवे तहसिलदार घाटंजी,न.प. मु्ख्याधिकारी राजु मोट्टेमवार,एकात्मिक बाल विकास अधिकारी नगराळे,तथा न.प माजी सभासद विक्की ठाकुर, व ईतरही मान्यवर मंचकावर उपस्थित होते. कार्यक्रम सुरवात माहामानवास पुष्षहार अर्पण करुन करण्यात आली. तदनंतर उपस्थित मान्यवरास पुषपगुच्छ,वृक्ष देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रम प्रस्तावणा करतांना मुख्याधिकारी मा. मोट्टेमवार साहेब यांनी योजने बाबत माहीती देत 28 जून 2024 रोजी शासन निर्णय जाहीर मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेचा अशिक्षीत व जेष्ठ महीलास सुविधा व्हावी व सर्वांना लाभ घेता यावा या करिता हे शिबीर असून जिल्ह्यात हे पहीलेच न. प. शिबीर असल्याचे स्पष्ट केले. तिन दीवस हा कम्प पाचटेबल लावून न. प. व्दारा चालवला जाणार ईतकच नाही तर हा कार्यक्रम वार्ड वाईज उपक्रम ‘शासन आले आपल्या दारी’ म्हणत राबवल्या जाणार हे उपस्थितास सांगितले.
एकात्मिक बाल विकास अधिकारी-यांनी योजनेची माहीती देत उपस्थिताच्या समसेचे निराकरण केले. या शिबीरास बहूसंख्येने महीला,जेष्ठ नागरिक,पत्रकार बांधव, न. प. कर्मचारी वर्ग न.प.शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रुपेश कावलकर सर यांनी केले. तर उपस्थितांचे आभार महाबलाय व्यायम शाळा प्रचारक यांनी केले.
००००००००००००००००००००