सामाजिक

खेळा खेळात 11 वर्षाच्या मुलीने घेतला साडेचार वर्षाच्या मुलाचा जीव 

Spread the love

प्रतिनिधी कोल्हापूर :

बालकांमध्ये खेळ आणि खेळात आपसात भांडण आणि रुसवे – फुगवे ही काही नवीन बाब नाही. लहान मुलं खेळतांना भांडतात , कट्टी होतात आणि काही वेळाने पुन्हा दोस्ती करून खेळायला लागतात.पण कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कोथळी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. येला 11 वर्षाच्या मुलीने खेळण्याच्या रागातून साडेचार वर्षाच्या मुलाला नदीत ढकलून दिल्याचा धक्कादायक आणि काळीज पिळवटून टाकणारा प्रकार घडला आहे.

ही घटना कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यातील कोथळी इथे घडली आहे. चार वर्षाच्या मल्लिकार्जुन बिसलसिदया पतंगी या बालकाचा यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या मल्लिकार्जुन यांचा कृष्णा नदीत शनिवारी मृतदेह सापडला. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हा संपूर्ण प्रकार घडकीस आणला आहे.

या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी अल्पवयीन मुलीची चौकशी केली असून तिला बालन्यायलयात हजर करण्यात येणार आहे. कोथळी येथील नेमगोंडा पाटील यांच्या वीट भट्टीवर काम करणार्‍या लक्ष्मी पतंगी यांचा मुलगा मल्लिकार्जुन पतंगी हा शुक्रवारी दुपारी 3 वाजल्यापासून बेपत्ता होता. रात्री उशीरा जयसिंगपूर पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल केली.

जयसिंगपूर पोलिसांनी तपास सुरू केला. दरम्यान शनिवारी दिवसभर पोलीस घटनास्थळी होते. वीटभट्टीजवळ असणार्‍या सीसीटीव्हीची मदत घेतली. 11 वर्षीय मुलीने मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्राकडे घेवून जात असल्याचे यामध्ये दिसलं आणि पोलिसांचा संशय तिच्यावर गेला.

जयसिंगपूर पोलिसांनी कृष्णा नदीच्या पात्रात शोधाशोध केल्यानंतर बेपत्ता असलेल्या साडेचार वर्षाच्या मल्लिकार्जुनचा मृतदेह शनिवारी संध्याकाळी सापडला. मृत मल्लिकार्जुन आणि 11 वर्षीय मुलीचे खेळण्याच्या कारणातून वाद होत होते.

हा राग मनात ठेवून या 11 वर्षीय मुलीने शुक्रवारी मल्लिकार्जुनला कृष्णा नदीच्या पात्रात धकलून जीव घेतल्याचं सत्य समोर आलं. दरम्यान, शनिवारी रात्री उशिरा शिरोळ येथे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छदेन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close