हटके

प्रेयसी वर बलात्कार करून प्रायव्हेटपार्ट मध्ये टाकली मिरची पूड

Spread the love

प्रेमसंबंध तोडण्याच्या धमकीने संतापला होता

सुरत ( गुजरात ) / नवप्रहार न्यूज नेटवर्क

                   गुजरातच्या सुरत येथून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. येथील एका प्रियकराने आपल्या प्रेयसी सोबत माणुसकीच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्याने प्रथम प्रेयसीला वायरने मारहान करत तिच्यावर बलात्कार केला आहे. यावरच समाधान झाले नाही की काय ? तिच्या प्रायव्हेटपार्ट मध्ये मिरची पूड टाकून तिला गंभीर रित्या जखमी केले आहे. या संतापजनक प्रकारानंतर प्रियकरावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार, निकुंज कुमार अमृत भाई पटेल असं आरोपीचं नाव आहे. तो विवाहित आहे. त्यानं विवाहित असल्याची बाब लपवून ठेवत पीडित तरुणीशी प्रेमसंबंध ठेवले. त्याची पत्नी दुसऱ्या गावात वेगळी राहात होती. आरोपीनं पीडित तरुणीला लग्नाचं आमिष दाखवलं होतं. पण आरोपीचं बिंग फुटल्यानंतर दोघांमध्ये भांडणाला सुरुवात झाली. यानंतर पीडित तरुणीने प्रेमसंबंध तोडण्याचा निर्णय घेतला.

तिच्या या निर्णयामुळे संतप्त झालेल्या आरोपी पटेलने तिला वायरने मारहाण केली आणि तिच्यावर बलात्कार केला. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने प्रेयसीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये मिरची पूड टाकली. तसेच तिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याचीही धमकी दिली. या संतापजनक घटनेनंतर गंभीर दुखापत झालेल्या तरुणीला रुग्णालयात दाखल करावं लागलं. यानंतर हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं.

याप्रकरणी ओलपाड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी आयपीसी ३७६ सह विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close