भोंदू बाबाच्या लैंगिक अत्याचहाराला बळी पडली विवाहित महिला

ग्वाल्हेर (मध्य प्रदेश) / नवप्रहार डेस्क
झाड़फुक, गंडेदोरे याने विविध उपचार करण्याचा दावा करणाऱ्या भोंदू बाबांकडून महिलांचे लैंगिक शोषण झाल्याच्या अनेक घटना घडतात. पण त्यानंतर देखील अनेक महिला अश्या भोंदू बाबांच्या एका तावीज द्वारे अनेक रोगांचा इलाज या प्रलोभणाला बळी पडतात. आणि आपली इभ्रत घालून बसतात. अनेक महिला लाजेखातर कुटुंबियांना त्यांच्या सोबत काय झाले ? हे सांगत नाहीत. त्यामुळे अश्या बाबांची हिम्मत आणखी वाढते. आणि याच गोष्टीचा फायदा घेत ते महिलांचे लैंगिक शोषण करत असतात. अश्याच खोट्या प्रचाराला बळी पडलेल्या महिलेसोबत किळसवाणा प्रकार घडला आहे.
ग्वाल्हेरजवळील उटीला गावात ही घटना घडली आहे. पीडित महिला भोंदूबाबाकडे पतीचे दारुचे व्यसन सुटावे यासाठी गेली होती. तुझ्या पतीवर काळ्या शक्तीचा प्रभाव असल्याचे भोंदबाबाने महिलेला सांगितले. पुढे तिला ब्लॅकमेल करू लागला. जर माझ्याकडे उतारा करायला आली नाहीस तर मी काळ्या शक्ती तुझ्या आणि तुझ्या पतीमागे लावेन, अशी धमकी भोंदूबाबने महिलेला दिली. पण पतीचे मद्यपान कमी होत नसल्याचे पाहून तांत्रिक आपला फायदा घेतोय असे महिलेच्या लक्षात आले. भोंदू बाबाने अनेकदा कॉल करून तिला बोलवण्याचा प्रयत्न केला. महिलेने याबाबतची माहिती पतीला दिली. त्यानंतर पोलिस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली.
पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर भोंदूबाबाच्या घरातील एका खोलीच्या आत आणखी खोली आढळली. त्यात तो कायम दिवा लावून ठेवत असे. या ठिकाणी महिलांसोबत नको ती कृत्य करत होता. आरोपीने घटनेनंतर आपण निर्दोष असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला. ही एक प्रक्रिया असल्याचे त्याने महिलेला सांगितले होते. दारू सोडवण्यासाठी काही वाईट गोष्टी अर्पण कराव्या लागतील, असे सांगितले होते.
पीडित महिलने तक्रारीत म्हटले आहे की, महिलेच्या पतीला एका खोलीत घेऊन गेला. काही वेळाने बाहेर येत त्याने उतारा केल्याचे सांगितले. तू त्याची पत्नी असल्याने तुझ्यावर पण उतारा करावा लागेल, असे तो म्हणाला. पतीचे दारूचे व्यसन सुटावे यासाठी महिला उतारा करण्यास तयार झाली. भोंदूबाबा तिला घेऊन खोलीत गेला. तिथे त्याने उताऱ्याच्या बहाण्याने बलात्कार केला. या उताऱ्याविषयी कोणाला सांगितलं तर पूजेचा उपयोग होणार नाही, असे त्याने तिला सांगितले. शिवाय, याबाबत कोणाला काही सांगितले तर तंत्र-मंत्र करून संपूर्ण कुटुंबाला मारून टाकेल, अशी धमकी दिली. महिला आणि तिचा पती बदनामीच्या भीतीने शांत राहिले. काही दिवसांनी भोंदूबाबा महिलेला वारंवार फोन करू लागला. तो तिला त्याच्याकडे बोलवत होता. अखेरीस त्रस्त झालेल्या महिलेने मेव्हण्याला या प्रकाराची माहिती दिली आणि प्रकरण पोलिसांपर्यंत नेले. पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.