निवड / नियुक्ती / सुयश

लऑस्ट्रेलियातील लॉयन्स आंतरराष्ट्रीय परेड मध्ये डॉ. राणे यांचे जल्लोषात स्वागत

Spread the love

डॉ. रिपल राणे यांचा ऑस्ट्रेलिया येथील आंतरराष्ट्रीय लायन्स अधिवेशनामध्ये सहभाग…

. डॉ. राणे यांनी मेलबॉर्न येथील आंतरराष्ट्रीय अधिवेशनात केले भारताचे प्रतिनिधित्व….

ग्रामीण भागातून या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाला उपस्थित राहणारे डॉ. राणे ठरले पहिले प्रांतपाल*….

लॉयन इंटरनॅशनल ही जगातील सर्वात मोठी सामाजिक संस्था असून ही संस्था 210 हून अधिक देशात कार्यरत आहे , या संस्थेमध्ये विविध क्षेत्रातील 15 लाखाहून अधिक सदस्य कार्यरत असून ते सर्वे समाजातील गरजूंना मदत करण्याच्या हेतूने नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असतात.
लायन्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून दरवर्षी जगातील एका मोठ्या शहरात या आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात येत असते, यावर्षी लायन्स क्लब इंटरनॅशनल द्वारे ऑस्ट्रेलिया येथील मेलबॉर्न शहरात या अधिवेशनाचे भव्य दिव्य आयोजन करण्यात आले होते.
या अधिवेशनामध्ये डिस्ट्रिक्ट ३२३४ H१ चे प्रांतपाल डॉ. रिपल राणे यांनी पत्नी डॉ कालिंदी राणे व विदर्भातील विविध क्षेत्रातून आलेल्या आपल्या 35 लॉयन पदाधिकाऱ्यांसोबत हिरारीने सहभाग घेतला . 21 जून पासून सुरू झालेल्या या अधिवेशनाची सांगता 26 जून रोजी संपन्न झाली, या चार दिवसीय आंतरराष्ट्रीय अधिवेशनामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले , त्यामध्ये प्रामुख्याने आंतरराष्ट्रीय सामूहिक परेड, विविध सामाजिक विषयावर चर्चा व व्याख्याने , आंतरराष्ट्रीय लॉयन अध्यक्षाची निवड याचा समावेश होता.
आजपर्यंत ग्रामीण भागातून या आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रांतपाल म्हणून उपस्थित राहणारे डॉ. रिपल राणे हे एकमेव प्रांतपाल ठरले. ऑस्ट्रेलियाच्या मेलबॉर्न शहरात मोठ्या दिमाखात निघालेल्या आंतरराष्ट्रीय सामूहिक लायन्स परेडमध्ये डॉ रिपल राणे व त्यांच्या चमुने उस्फूर्तपणे सहभाग घेतला , याप्रसंगी त्यांचे व त्यांच्या चमूचे मेलबॉर्न शहरात जोरदार स्वागत करण्यात आले .
2०० देशाहून अधिक देशांच्या प्रतिनिधीने आपल्या देशाच्या ध्वजासोबत व आपल्या पारंपारिक वेशभूषेसोबत या आंतरराष्ट्रीय परेडमध्ये सहभाग घेतला .16000 हून अधिक जागतिक लॉयन पदाधिकारी या आंतरराष्ट्रीय परेडमध्ये सहभागी होते हे विशेष.
याप्रसंगी वर्ष 2024-25 साठी ब्राझील या देशाचे फॅब्रिशिओ एलोवेरा यांची सर्वानुमते आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली, तर भविष्यातील वर्ष 2025-26 साठी भारताचे ए पी सिंग तसेच वर्ष 2026-27 साठी केनिया या देशाचे मनोज शहा यांची सर्वानुमते आंतरराष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली.
ऑस्ट्रेलिया या देशाच्या दौऱ्यावरून परतताना डॉ. राणे यांचे छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्ट मुंबई येथे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर एअरपोर्ट नागपूर येथे विदर्भातील असंख्य लायन्स पदाधिकाऱ्या तर्फे भव्य स्वागत करण्यात आले, सोबतच डॉ.राणे यांचा कार्यभार एक जुलैपासून सुरू होत असून सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉ राणे यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close