Uncategorized

निघोज च्या अनन्या लंकेचे राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग यश .

Spread the love

 

पारनेर [ श्री सुरेश खोसे पाटील यांजकडून ] – पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनी अनन्या संदीप लंके इयत्ता दुसरी हिला नॅशनल स्कॉलरशिप परीक्षेत २०० पैकी १९२ गुण मिळून राज्यात पाचवा क्रमांक मिळाला आहे .
राष्ट्रीय शिष्युवृत्ती परीक्षा संपूर्ण महाराष्ट्रात राज्यात घेतली जाते . दि . ६ जुलै रोजी या परीक्षेचे विभाग प्रमुख नितीन जमदाडे यांनी राज्यात येणाऱ्या पहिल्या एक ते पाच मध्ये आलेले व नगर जिल्ह्यातून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा आयोजीत केला , या सोहळ्यात नगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील यशस्वी विद्यार्थी आले होते .या उत्तुंग यशाबद्दल नगरमधील सावेडी येथील श्रेयस लॉन्स येथे या परीक्षेमध्ये उत्तुंग गुण यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यां चा गुणगौरव सोहळा पार पडला .
या सोहळ्यासाठी सहाय्यक राज्य कर आयुक्त दत्तात्रय भेसे, राज्य कर निरीक्षक अनिता मरकड, राज्यकर निरीक्षक अर्जुन दारकुंडे नगर तालुका पोलीस उपनिरीक्षक रणजीत फुलसिंग डॉ राजेश गायकवाड , प्रहार अकॅडमीचे मालोजी शिखरे सर , विभाग प्रमुख नितीन जमदाडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते . मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला .
अनन्या लंके ही ला निघोज येथील कुंड वस्ती वरील प्राथमिक शाळेतील शिक्षक सोपान शिंदे सर व संगीता खोडदे यांचे मार्गदर्शन लाभले . अनन्या च्या उत्तुंग यशाबद्दल निघोज परिसरातून कौतूक होत आहे .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close