घरी परतणाऱ्या तरुणींचे अपहरण : लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या जोडप्याचा प्रताप

नागपूर / नवप्रहार मीडिया
भंडारा जीह्यातील तुमसर तालुक्यात येत असलेल्या माडगी येथे स्वप्नील दिलीप मरसकोल्हे (वय २४) आणि चेतना विजय बुरडे (वय २३) हे राहत होते. चेतनाच्या कुटुंबियांना तिच्या अनैतिक संबंधाबद्दल कळताच तिच्या कुटुंबीयांनी तिच्या पासून सुरक्षित यानंतर ठेवले होते. त्यामुळे ते नागपूर येथे हिंगणा रोड येथील डिमार्ट च्या मागे राहत होते. ते दोघेही स्पर्धा परीक्षेची फायरी करीत असल्याने त्यांच्यावर तीन लकहांच्या जवळपास कर्ज झाले होते. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्याने ‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या प्रेमीयुगुलाने नोकरीवरून घरी परत जाणाऱ्या युवतीचे अपहरण करीत वडिलांना तीस लाखांची खंडणी मागितल्याची धक्कादायक घटना समोर आली.
याप्रकरणी प्रतापनगर पोलिस आणि गुन्हे शाखेच्या युनिट एकने दोघांना हिंगणा येथून अटक केली आहे. याप्रकरणी जयदीप कृपाशंकर गढवाल (वय ५५, रा. प्रकाशनगर, गोधनी रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
स्प्नी)नल दिलीप मरसकोल्हे (वय २४) आणि चेतना विजय बुरडे (वय २३, दोन्ही रा.हिंगणा रोड, डीमार्टमागे) अशी आरोपींची नावे आहेत. जयदीप पारशिवनीतील कोलमाईन्सला सबस्टेशनला अटेडन्स असून मुलगी एनआयटी कॉलेजमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदविका मिळवून एमएचएस कंपनीत आहे. सकाळी अकरा वाजता २० मार्चला ती कंपनीत जाण्यासाठी निघाली. रात्री सव्वानऊच्या सुमारास तिने आईच्या मोबाइलवर फोन करून दहा वाजता घरी येईल असे सांगितले.
दरम्यान आई यशोदा यांनी पाच मिनिटांनी मुलीच्या मोबाइलवर पुन्हा फोन केला असता, तिने फोन उचलला नाही. दोन मिनिटांनी तिचा फोन बंद झाला. घरच्यांनी मुलीच्या कार्यालयात फोन केला असता कर्मचाऱ्यांनी मुलगी पावणे नऊ वाजता गेल्याचे कळवले. आई-वडील आणि नातेवाइकांनी शोध घेतला. ती आढळून न आल्याने प्रतापनगर पोलिसांत तक्रार दाखल केली.
दुसऱ्या दिवशी दुपारी मुलीच्या आईच्या मोबाइलवर भोजपुरी भाषेत बोलणाऱ्याने त्यांना मुलीला जीवंत बघायचे असल्यास ३० लाख रुपये जमा ठेवा असे सांगितले. त्याने पैसे कुठे द्यायचे ते शनिवारी (ता.२२)सांगेन असे म्हणून फोन ठेवला. याबाबत मोहितने पोलिसांना माहिती दिली. कॉल्सचे लोकेशन युनिट एकचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुहास चौधरी आणि प्रतानगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित सावंत यांच्या पथकाने तपासले. ते हिंगण्यातील डी-मार्टच्या मागच्या भागातील असल्याचे आढळले. पोलिसांनी छापा टाकून मुलीची सुटका केली व दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांना जिल्हा व सत्र न्यायालयात सादर करीत २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळविली.
उच्चशिक्षित प्रेमीयुगुल
स्वप्नील आणि चेतना हे दोघही तुमसर तालुक्यातील माडगी येथे राहत होते. स्वप्नीलसोबत तिचे संबंध असल्याचे कळताच, चेतनाच्या कुटुंबाने तिला दूर सारले होते. त्यामुळे दोघेही नागपुरात ‘लिव्ह इन’ मध्ये राहात होते. स्वप्नील प्लास्टो कंपनीत होता. चेतनाने ही बीएसस्सी ॲग्रीकल्चरची पदवी मिळविली होती. याशिवाय दोघेही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होते. मात्र, त्याच्यावर दोन ते तीन लाखांचे कर्ज होते. कर्ज देणारे त्याच्या घरी यायचे. त्यातून त्यांनी हा प्लॅन रचल्याची माहिती समोर आली.
अपहृत युवतीने केला संपर्क
स्वप्नील आणि चेतना यांनी तरूणीला एका घरात बांधून ठेवले होते. दरम्यान शुक्रवारी सायंकाळी दोघेही नसताना, तिने एका मोबाइलवरून आपल्या वडिलांना फोन करून तिला एका ठिकाणी ठेवण्यात आल्याचे सांगितले. या मोबाइलचे लोकेशन पोलिसांनी तपासले असता, ते हिंगण्यातील महाजनवाडी येथील असल्याचे आढळून आले. त्यातून पोलिसांनी शिफातीने दोघांनाही अटक केली.