हटके

बाप..रे बाप…. पँटात घुसला साप 

Spread the love

मुंबई  / नवप्रहार डेस्क 

              पावसाळा सुरू झाल्यावर अनेक ठिकाणी नैसर्गिक धबधब्यातून पाणी वाहू लागते. अश्या ठिकाणी पर्यटक , निसर्गप्रेमी जाण्याचा मोह आवरू शकत नाही. जंगलात असलेल्या धबधब्याच्या आजूबाजूला झाडे झुडपे असतात. जमिनीत बीळ करून राहत असलेले  सरपटणारे प्राणी त्यांच्या अधिवासात पाणी शिरल्याने बाहेर पडतात. त्यात साप देखील असतात. त्यामुळे पाऊस पडल्यावर निसर्गाचा आनंद घेत असताना काही गोष्टींची काळजी घेणे देखील जरूरीचे होवून जाते. असे असले तरी धबधब्याखाली आंघोळीचा आनंद घेताना लोक बाकी कुठल्याही गोष्टीची चिंता करत नाही. मित्रांसमवेत आंघोळी साठी गेलेल्या एका तरुणाच्या पॅटात साप शिरल्याने त्याची फजिती झाली होती. मोठ्या प्रयत्नानंतर त्याच्या मित्रांनी सापाला खेचून बाहेर काढले

पावसाळा सुरु झाल्याने सर्व तरुण मंडळींची पावले धबधब्याच्या ठिकाणी वळू लागले आहेत. अशाच धबधबा आणि पाण्याच्या ठिकाणी जाणाऱ्या तरुणांसोबत धक्कादायक घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या लोणावळ्यातील भूशी डॅमला फिरायला गेलेल्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. तर काल तामिनी  घाटातही एक तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली. धबधब्याच्या ठिकाणी तरुणांसोबत भयंकर घटना घडू लागल्या आहेत. असाच एक प्रकार एका तरुणासोबत घडला. मात्र, या घटनेतून तरुणाचा जीव थोडक्यात वाचला.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

मित्रांसोबत धबधब्यात पोहोयला गेलेल्या तरुणासोबत धक्कादायक प्रकार घडला. तरुण हा धबधब्याच्याखड्ड्यातील पाण्यात पोहत होता. तरुण पोहत असताना त्याच्या पँटीत अचानक साप शिरला. पाण्यात पोहताना पँटीत साप शिरल्याचे कळताच तरुण पाण्याबाहेर आला. त्याच्या मित्रांनी हा साप पाहिला. या तरुणाने पँटीत शिरलेल्या सापाचे डोके दाबून धरले. तर पँटीत शिरलेला साप त्याचे मित्र काढू लागले.

सापाला पाहून त्याच्यासहित त्याचे सर्व मित्र घाबरले होते. मात्र, ते मित्राचा जीव वाचण्यासाठी सापाला पँटमधून बाहेर खेचत होते. काही वेळ प्रयत्न केल्यानंतर त्याच्या मित्राने जोर लावून साप पँटीच्या बाहेर खेचला. त्यानंतर या मित्रांनी सापाच्या तावडीतून मित्राची सुटका केली. या घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेचा धक्कादायक थरार सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ नेमक्या कोणातील भागातील आहे, हे कळू शकलेले नाही. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ भारताबाहेरचा असण्याची देखील शक्यता आहे. या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून शेकडो प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच तरुणासोबत घडलेला भयंकर प्रकार सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close