हटके

स्टेजवरच वधू आणि वरात दे दणादण ….

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार न्यूज नेटवर्क

               लग्न हा वधू आणि वरा साठी आनंदाचा क्षण असतो. यावेळी दोन्ही कडील मंडळी देखील आनंदात असतात. प्रत्येक मंडळी या क्षणाचा आस्वाद घेत असतात. काही लग्नात कुठल्यातरी कारणावरून वराती अथवा घराती यांच्यात वाद होतो ही पणअन्य उपस्थित त्यात हस्तक्षेप करून तो निवळतात. पण स्टेजवर वरमाळेसाठी उभ्या असलेल्या वधू आणि वरात वाद हा क्वचितच पाहायला मिळतो. पण आम्ही आपणाला ज्या घटनेबद्दल सांगणार आहोत त्यात वधू आणि वरात स्टेजवरच हाणामारी झाली. आणि दोघांनी ऐकमेकांना धु धु धुतले.या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून त्यावर अनेक मजेशीर कॉमेंट्स देखील येत आहेत. 

या घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये वधू-वर स्टेजवरच एकमेकांना मारताना दिसत आहेत. स्टेजवरील हे दृश्य पाहून सगळेच थक्क झाले. वरमाळा समारंभानंतर वधू-वर मंचावर उभे आहेत.

लग्नात उत्सवाचं वातावरण आहे. आजूबाजूला अनेक नातेवाईक आणि पाहुणे उपस्थित आहेत. पण पुढच्याच क्षणी तिथे असं काही घडतं की वधू आणि वर एकमेकांना जबर मारहाण करू लागतात. हे पाहून तिथे उपस्थित सगळेच शॉक होतात.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की वधू आणि वर स्टेजवर उभा आहेत. मात्र, अचानक त्यांच्यात काहीतरी वाद होतो आणि दोघंही एकमेकांना मारू लागतात. यादरम्यान एक व्यक्ती त्यांना थांबवण्याचा प्रयत्नही करते, पण दोघंही थांबत नाहीत.  वधू-वरामध्ये झालेल्या हाणामारीचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

@bridal_lehenga_designn नावाच्या अकाऊंटवर इन्स्टावर व्हिडिओ शेअर करून युजरने कॅप्शन दिलं आहे, ‘आता विचार करा भाऊ, कोणाला लग्न करायचं आहे. एक दिवसापूर्वी अपलोड केलेल्या व्हिडिओला शेकडो लाईक मिळाले आहेत. सोबतच हा व्हिडिओ पाहून लोक यावर कमेंट करत आहेत. काही यूजर्सचं असंही म्हणणं आहे, की हा व्हिडिओ स्क्रिप्टेड असू शकतो. आता हे माहित नाही, परंतु वधू-वरानी ज्या प्रकारे एकमेकांना मारलं ते पाहून बहुतेक वापरकर्त्यांना हसू आवरत नाहीये. एका यूजरने लिहिलं आहे की, त्या व्यक्तीला टॅग करा जो लग्न करणार आहे. दुसरा वापरकर्ता म्हणतो, अरे भाऊ, 36 पैकी 36 गुण जुळले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close