श्री क्षेत्र पानेटच्या विकासासाठी आमदारांपाठोपाठ खासदारांचेही एक पाऊल पुढे
पूर्णा नादिपात्रातुन बांधून देणार मोठा पूल
खा अनुप धोत्रे यांची ग्वाही
अकोला /प्रतिनिधी
धार्मिक कार्यामध्ये सदैव आघाडीवर असणाऱ्या श्री क्षेत्र पानेट संस्थानच्या सर्वांगीन विकासासाठी अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. त्यात अधिक भर घालत स्वयंभु महादेवाच्या भुयारातील मंदिर बांधकामासाठी सुद्धा 20 लक्ष रुपये मंजूर केले आहेत.
त्या पाठोपाठ आता खासदार अनुप धोत्रे यांनीही एक पाऊल पुढे येत ब्रह्मचारी महाराज समाधी मंदिरापासून ते भुयारातील स्वयंभु महादेवाच्या मंदिराकडे येण्यासाठी भाविकांना पूर्णा नदीच्या पात्रातून मार्गक्रम करावे लागते. ही बाब लक्षात घेत या नदीच्या मध्यभागी मोठा पूल बांधून देण्याची ग्वाही खासदार अनुप धोत्रे यांनी हजारो भाविकांना दिली आहे.
विकासाला चालना देणाऱ्या आमदार रणधीर सावरकर व खासदार अनुप धोत्रे यांनी घेतलेल्या या निर्णयाबद्दल भाविकांनी त्यांचे मनापासून आभार मानले आहेत.