पर्यवेक्षक व तालुका क्रीडा मार्गदर्शक कपिल ठाकूर यांचा सन्मान
आर्वी, प्रतिनिधी /पंकज गोडबोले
आर्वी :-कन्नमवार विद्यालय आर्वी येथील पर्यवेक्षक व तालुका क्रीडा मार्गदर्शक कपील ठाकूर यांना प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी महाराष्ट्र शासनाचा जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक हा पुरस्कार प्राप्त झाला त्या प्रित्यर्थ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानद सचिव सुमित दादा वानखडे व आर्वी चे आमदार दादारावजी केचे व बी आर एस पक्षाचे जिल्हा समन्वयक जय दादा बेलखेडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला कपिल ठाकूर हे सतत तीस वर्षापासून व्हॉलीबॉल या खेळात विविध वयोगटाचे खेळाडू तयार करून त्यांना मार्गदर्शन करत आहे आर्वी हे शहर वॉलीबॉल या खेळासाठी विदर्भाचे माहेरघर म्हणून प्रख्यात आहे त्याचा वारसा कपिल ठाकूर हे चालवत आहे हे विशेष त्यांच्या मार्गदर्शनात बरेचसे राज्यस्तरीय व राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाले त्याची फलश्रुती हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.