सोलर एक्सप्लोजिव्ह बाजारगाव (चाकडोह) कंपनी जबरदस्त विस्फोट!
नऊ कामगार मृत्युमुखी
वाडी प्र
अमरावती राष्ट्रीय महामार्ग वरील बाजार गाव (चाकडोह), येथील सोलर एक्सप्लोजिव्ह कंपनीत सकाळी 8 चा दर्मीयान मोठा ब्लास्ट झाला. प्राथमिक माहिती नुसार सोलार कंपनी चा सी बी एच २ युनिट मध्ये उपस्थित १२ कामगार होते त्यात ०९ कामगारांचा जागेच मृत्यू झाला तीन कामगार जखमी झाल्याची माहिती आहे. मृत्यू झालेल्या मध्ये 6 महिला व तीन 3 पुरुष आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, व ईतर प्रशासकीय अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. जखमीना त्वरित शासकीय रुग्णालय नागपूरला नेले. घटना स्थळी वंचित बहुजन युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष मनीष बोरकर, तालुका आय टी सेल प्रमुख रोहित राऊत, जिल्हा उपाध्यक्ष अतुल शेंडे यांनी पीडित कुटुंबाना भेट देऊन सांत्वन दिले गावातल्या नागरिक मोठया संख्येने आल्या मुळे काही काळ तणावं पूर्ण वातावरण निर्माण झाले होते. स्फोट कशामुळे झाला त्याचे नेमके कारण समजले नाही तरी कामगारांचा सुरक्षे चा दृष्टीने कंपनी तर्फे काय उपाययोजना आहेत याची चौकशी संबंधित विभागाकडून करण्यात यावी अशी मागणी शासनाला वंचित बहुजन आघाडी तर्फे करण्यात येणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. नऊ मृतांमध्ये युवराज चरोदे, ओमेश्वर मछिर्के, मिता युकी, आरती सहारे, श्वेताली मारबते, पुष्पा मनपुरे, भाग्यश्री लोणारे, रुमिता युकी, मोसम पटले यांचा समावेश आहे.