क्राइम

लग्नाच्या 57 वर्षानंतर पतीने केले पत्नीचे 57 तुकडे हे आहे कारण …. 

Spread the love

पाटणा  / नवप्रहार डेस्क 

                    कधी कोणती गोष्ट मनुष्याच्या मनाला लागेल आणि तो अकल्पनिय निर्णय घेईल याचा काही नेम नसतो. अशीच घटना पाटण्यात घडली आहे. लग्नाला 57 वर्ष झालेल्या शिक्षक पतीने पत्नीचे तुकडे करण्यामागील कारण हे आहे. बिहारच्या अरवाल जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना आहे.

जमुहरी गावातील हे प्रकरण. 76 वर्षीय सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसादची पत्नी सुमती सिन्हाची हत्या केली आहे. आरोपी बिरबलने कुटुंबातील इतर सदस्यांना खोलीत बंद करून हे कृत्य केल्याचं सांगितलं. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुलगा खासगी शाळेतून घरी आला असता घरात रक्त पाहून आरडाओरडा करू लागला. यादरम्यान बिरबलने सून आणि नातवासह गावकऱ्यांना हातात धारदार शस्त्र घेऊन धमकावण्यास सुरुवात केली.

लग्नाला 57 वर्षे, पत्नीचे केले 57 तुकडे

या घटनेची माहिती मिळताच मेहंदिया पोलिसांनी घटनास्थळ गाठून मारेकऱ्याला अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून धारदार शस्त्र जप्त केलं आहे. या संदर्भात एसपी राजेंद्र कुमार भील यांनी सांगितलं की, सेवानिवृत्त शिक्षक बिरबल प्रसाद याला अटक करण्यात आली असून त्याने पत्नीचे 57 तुकडे केल्याचा दावा केला आहे. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोपी बिरबल प्रसादने सांगितलं, लग्नाला 57 वर्षे झाली होती, त्यामुळे त्याने पत्नीचे एकूण 57 तुकडे केले. पोलिसांनी सांगितलं की, मृतदेहाचे सुमारे 12 तुकडे करून विच्छेदन करण्यात आलं होतं. या घटनेची संपूर्ण गावात चर्चा सुरू आहे.

लग्नाच्या 57 वर्षांनंतर पत्नीने ते सत्य सांगितल्याने हत्या

बिरबलची पत्नी सुमतीने आपल्या काकांशी अवैध संबंध होते असं सांगितलं. त्यानंतर बिरबल संतापला. तिचे काका 8 वर्षांपूर्वी वारले. तरी या अवैध संबंधाची माहिती मिळताच बिरबलने रागाच्या भरात सुमतीची धारदार शस्त्राने हत्या केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close