शिवजयंती सामूहिक रित्या साजरी

मोर्शी(तालुकाप्रतिनिधी) शिवतीर्थ प्रतिष्ठान, तारामाता संस्थान व गुरुदेव सेवा मंडळ चिंचोली गवळी यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि.19 फेब्रुवारी रोजी जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने चिंचोली गवळी येथे आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 31 रक्तदात्यांनी रक्तदान करून मोलाचे सहकार्य केले.राज्यसभा खासदार डॉ.अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली 365 दिवस निरंतर रक्तदान अभियाना अंतर्गत या रक्तदान शिबिरामध्ये परिसरातील अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
उन्हाळ्याच्या दिवसात होत असलेल्या रक्त तुटवड्यामुळे रुग्णांना रक्त मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे अनेक वेळा अपघात घडल्यास वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णाला प्राणास मुकावे लागते. तसेच शस्त्रक्रिया करतांना रक्त मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते प्रसंगी मोठी किंमत देऊन रक्त विकत आणावे लागते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यात नेहमीच मोलाचा वाटा उचलणारे शिवतीर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील सोमवंशी यांच्या नेतृत्वात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी शिवतीर्थ प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुनील सोमवंशी यांचा गावकऱ्यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. रक्तदान संकलनासाठी
लाईफलाईन ब्लड सेंटर अमरावतीच्या,डॉ.प्रीती बांबल,प्रवीण साठवणे, भाग्यश्री लांजेवार, पल्लवी खोब्रागडे, शिवानी व्यवहारे, आरजु फुंडे,
शंकर सुरणकर,पंकज मडावी, मंगेश बोंडे हि टीम उपस्थित होती.या शिबिराला सिताफळ महासंघाचे जिल्हा समन्वयक दिनेश शर्मा भाजपाचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.