मंदिराची दानपेटी चोरणारा आरोपी एलसीबी च्या ताब्यात
चांदुर बाजार / नवप्रहार मीडिया
मंदिराची दानपेटी चोरून रक्कम लंपास करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने शिताफीने अटक केली आहे. त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे. आकाश पुंडलिक नांदणे वय २२ वर्ष रा. बोराळा ता. चांदुर बाजार जि. अमरावती असे आरोपीचे नाव आहे.
मा. श्री. अविनाश बारगळ, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा. यांनी जिल्हयात घरफोडी चोरीचे गुन्हयांना आळा बसावा याकरीता जिल्हातील व जिल्हयाबाहेरील घरेफोडी चोर यांचा शोध घेवुन जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणनेबाबत आदेशित केल्यावरुन पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती” ग्रा. यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमुन आवश्यक सुचना दिल्या होत्या.
त्या अनुषंगाने दिनांक २७/०८/२०२३ रोजी पो.स्टे. चांदुर बाजार अप क्र. ५८३ / २०२३ कलम ४५४,३८० भा.द.वि. च्या गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना मिळालेल्या गोपनिय माहीतीदारांच्या मदतीने तसेच तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी नामे आकाश पुंडलिक नांदणे वय २२ वर्ष रा. बोराळा ता. चांदुर बाजार जि. अमरावती यास कुरळपुर्णा शेतशिवार येथुन शिताफीने ताब्यात घेवुन त्यास गुन्हयाबाबत सखोल विचारपुस केली असता त्याने दिनांक २७/०८/२०२३ रोजी ग्राम कुरळपुर्णा येथील भगवान पुरी महाराज मंदीरातील दान पेटीसह रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. तसेच नमुद आरोपीने चांदुर बाजार येथील मारवाडी पुरा येथील गणपती मंदीर व दिनांक २१/०८/२०२३ रोजी माळीपुरा येथील राम मंदीरातील पेटीसह रक्कम चोरी केल्याची कबुली दिली आहे. वरुन नमुद आरोपीकडुन गुन्हयातील चोरी गेलेल्या रक्कमेपैकी ४७६०/- रु व रिअलमी कंपनीचा मोबाईल कि ५००० रु असा एकुण ९७६०/- रु चा जप्त करुन मुद्देमालासह आरोपीस पो.स्टे. चांदुर बाजार यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास पो.स्टे. चांदुर बाजार हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा पोलीस अधिक्षक श्री. अविनाश बारगळ, अप्पर पोलीस अधिक्षक शशिकांत सातव यांचे पोलीस निरीक्षक स्थागुशा श्री. किरण वानखडे यांचे मार्गदर्शनात पो.उप.नि. नितीन चुलपार, अंमलदार संतोष मंदाणे, बळवंत दाभणे रविन्द्र बावणे, भुषण पेठे, पंकज फाटे चालक पो. कॉ. निलेश मेहरे यांचे पथकाने केली आहे.