सामाजिक
कारच्या रुपात मागून आलेल्या मृत्यूने गाठले
कारची धडक रिक्षातून बाहेर फेकल्या गेलेल्या तरुणीचा मृत्यू
सोलापूर / नवप्रहार मीडिया
मृत्यू कधी कसा येईल याचा काही नेम नसतो. तुम्ही लोकांच्या गर्दीत जरी असले तरी तो तुम्हाला गाठतोच. अशीच घटना सोलापूर शहरातील सोलापूर विद्यापीठा समोर राष्ट्रीय महामार्गावर घडली आहे. कार ने रिक्षाला धडक दिल्याने त बसलेली तरुणी रिक्षाच्या बाहेर फेकल्या गेल्याने तिचा मृत्यू झाला आहे. या अपघातातील दोघे गंभीर जखमी आहेत. भाग्यश्री कांबळे असे त्या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, भाग्यश्री कांबळे (१९) ही विद्यार्थिनी रिक्षातून फेकली गेली. मुख्य रस्त्यावर असलेल्या रिक्षातून फेकली गेलेली भाग्यश्री सर्विस रस्त्यावर आपटली. यामुळे तिला गंभीर दुखापत झाली. त्याचबरोबर रिक्षात तिच्यासोबत असलेली तिची मैत्रीण ऐश्वर्या जगन्नाथ सोडगी (वय १७) ही या अपघातात गंभीर जखमी झाली. तिच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे.
अपघातात रिक्षात असलेला आदित्य सुनील भोसले (वय १४) हा आठवी शिकणारा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी सोलापूर शहरातील अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर ऐश्वर्या सोडगी हिच्यावर अश्विनी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अज्ञात कारचालका विरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोंडीत भाग्यश्री कांबळे ही शहरातील गांधीनाथा कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. वडील निवृत्ती कांबळे हे शासकीय सेवेत चतुर्थश्रेणी कर्मचारी असून भाग्यश्रीला एक बहीण आहे. भाग्यश्रीच्या अपघाती मृत्यूमुळे कोंडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1