क्राइम

पुणे पोलिसांकडून ऑनलाईन चालणाऱ्या हायप्रोफाईल वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश

Spread the love

राजस्थानी अभिनेत्रीसह दोन विदेशी तरुणींना घेतले ताब्यात 

पुणे / प्रतिनिधी

महानगर मध्ये पाश्चात्य संस्कृती मोठ्या प्रमाणात पाय पसरत आहे. महानगर मध्ये अनेक लोक आपल्या कुटुंबापासून वेगळे राहतात. कामाचा व्याप बघता त्यांना महिनो महिने घरी जायला भेटत नाही. कामाचा ताण असल्याने या लोकांना प्यायला आवडते.सेक्स केल्याने डोक्यावरील ताण कमी होतो या  मानसिकतेतुन असे लोक स्रीगमन देखील करतात. काही आंबटशौकीन देखील हे काम करतात.

या लोकांच्या याच मानसिकतेमुळे स्पा सेंटर, मसाज सेंटर, आयुर्वेदिक पंचकर्म च्या नावाखाली वेश्याव्यवसाय और झाले आहेत. शहराच्या विमान नगर भागात ऑनलाईन हायप्रोफाईल वेश्याववसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकत राजस्थानी अभिनेत्रीसह दोन परदेशी मॉडेलना ताब्यात घेतलं आहे.

उजबेकिस्थान मधून आलेल्या दोन मॉडेल ऑनलाइन वेश्या व्यवसाय करत होत्या. पुणे पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. तिन्ही महिला आरोपींनी पुण्यातील विमान नगर भागात गेल्या अनेक दिवसापासून ऑनलाइन वेश्याव्यवसाय सुरू केला होता.

विदेशातून ऑनलाइन माध्यमातून वेश्या व्यवसाय भारतात चालवण्यात येत असल्याची माहिती तपासात उघड झाली आहे. वेश्या व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने चालवणाऱ्या आरोपींचा पुणे पोलिसांकडून शोध सुरू आहे. सध्या 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close