ट्रेकिंग करत असताना दिसली दगडाची झोपडी ; कुतूहलवश आत डोकावले तर ……
खरंतर ही व्यक्ती डोंगरावर ट्रेकिंग करत असतान अचानक त्याला दगडाची झोपडी दिसली. जेव्हा त्याने झोपडीच्या आत डोकावले तेव्हा त्याला एक खोल बोगदा दिसला. त्याने हिंमत एकवटली आणि तो आत शिरला. तिथले दृश्य पाहून त्याला वाटले की तो दुसऱ्या जगात पोहोचला आहे. आता त्या व्यक्तीने या संपूर्ण अनुभवाशी संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
इंस्टाग्राम वापरकर्ता जोशुआ मॅकार्टनी हा एक गिर्यारोहक आहे जो पर्वतांवर फिरायला जातो आणि त्याच्या 5 लाख फॉलोअर्ससाठी व्हिडिओ देखील पोस्ट करतो. अलीकडेच त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्यामध्ये तो डोंगरावर फिरायला गेला होता, तिथे त्याला दगडाची झोपडी दिसते. या घरासारख्या झोपडीत प्रवेश केल्यावर त्याला एक खोल बोगदा दिसतो, ज्याला लोखंडी पायऱ्याही आहेत. पायऱ्या उतरताना त्याला आणखी एक बोगदा दिसतो, तो पुन्हा खाली जात आहे.
सध्या हा व्हिडिओ जोदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर लोकांनी कमेट्स देखील केल्या आहेत. अनेकांना आपलं मत मांडलं आहे. अनेकांनी सांगितले की हा हवाई हल्ला बंकर असू शकतो, तर अनेकांनी सांगितले की ते अणुबॉम्ब हल्ल्यापासून वाचण्याचे ठिकाण असू शकते. बऱ्याच लोकांनी सांगितले की हे एक लष्करी बंकर असेल, जे बहुधा क्रोएशियामध्ये आहे. युद्धाच्या वेळी येथे सैनिक लपून बसायचे. या व्हिडिओला 27 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.