राज्य/देश

जवनाचे अपहरण करून हत्या ; 10 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यादेखत घडला प्रकार

Spread the love

मणिपूर / नवप्रहार मीडिया

                   मागील काही दिवसांपासून हिंसाचारने धगधगत असलेल्या मणिपूर मध्ये आता कुठे काहीशी शांती दिसत होती. पण घरी सुटीवर आलेल्या जवनाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याचा प्रकार घडल्याने परिसरात खळबळ माजली आहे. हा सर्व प्रकार मृत जवानाच्या 10 वर्षाच्या मुलाच्या डोळ्यादेखत घडला आहे. संबंधित जवानाचा मृतदेह रविवारी इंफाळ पूर्व जिल्ह्यातील खुनींगथेक गावात आढळला.

      गेल्या काही दिवसांपासून मणिपूर येथील परिस्थिती बिघडलेली आहे. कुकी आणि मैतेई लोकांमध्ये सुरू असलेली हिंसा अद्यापही थांबण्याचे नाव नाही. येथे थोड्या बहुत शांततेनंतर पुन्हा हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. संरक्षण करणाऱ्या जवानांवरही हल्ले केले जात आहेत. जवानाचे नाव सीपॉय सेर्तो थांगथँग कोम असल्याचे समजते. ते आर्मीच्या डिफेन्स सिक्योरिटी कोर प्लाटूनमध्ये कांगपोक्पी येथील लिमाखोंगमध्ये तैनता होते. ते पश्चिमी इंफाळमधील तारुंग येथील रहिवासी होते. संबंधित जवानाचे अपहरण झाले, तेव्हा त्याचा चिमुकलाही तेथेच होता.

सकाळच्य सुमारास घडली घटना –
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीपॉय कोम सुट्टीवर आपल्या घरी आले होते. सकाळच्या सुमारास 10 अज्ञात शस्त्रधाऱ्यांनी सीपॉय कोम यांचे त्यांच्या घरून अपहण केले. केवळ त्यांचा 10 वर्षांचा मुलगाच या संपूर्ण घटनेचा प्रत्यक्ष साक्षिदार आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने सांगितले आहे की, तीन लोक त्यांच्या घरात शिरले होते. तेव्हा तो त्याच्या वडिलांसोबत घरात काम करत होता. शस्त्रधाऱ्यांनी सीपॉय यांच्या लोक्याला पिस्तुल लावले आणि त्यांना एका पांढऱ्या वाहनात बसून नेले. लष्करातील जवानांना सीपॉयच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी पाठवण्यात आले आहे. मृत जवानावर कुटुंबाच्या इच्छेनुसार अंत्यसंस्कार केले जातील.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close